AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ODI World Cup 2027 स्पर्धेसाठी 12 मैदानं कोणती ते ठरलं, विराटची या खेळपट्ट्यांवर कशी आहे कामगिरी?

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेला आता अवघ्या एका वर्षांचा अवधी शिल्लक असल्याने जोरदार तयारी सुरू झाली आहे. या स्पर्धेसाठी 12 मैदानांची नावंही जाहीर झाली आहेत. या मैदानात विराट कोहलीची कामगिरी कशी आहे? ते जाणून घेऊयात..

ODI World Cup 2027 स्पर्धेसाठी 12 मैदानं कोणती ते ठरलं, विराटची या खेळपट्ट्यांवर कशी आहे कामगिरी?
ODI World Cup 2027 स्पर्धेसाठी 12 मैदानं कोणती ते ठरलं, विराटची या खेळपट्ट्यांवर कशी आहे कामगिरी?Image Credit source: PTI
| Updated on: Jul 31, 2026 | 3:01 PM
Share

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेला 4 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 21 नोव्हेंबरपर्यंत क्रिकेटचा महाकुंभ दक्षिण अफ्रिकेत भरणार आहे.24 वर्षानंतर अफ्रिकन देशात स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी यजमान दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया देशातील एकूण 12 मैदानं ठरवण्यात आली आहेत. दक्षिण अफ्रिकेतील खेळपट्ट्या भारताच्या दृष्टीने खूपच आव्हानात्मक आहेत. कारण या खेळपट्ट्यांवर चेंडू उसळतो, तसेच वेगाने येतो. पण विराट कोहलीला याची जराही चिंता नाही. कारण दक्षिण अफ्रिकेत त्याची बॅट बोलते. चला जाणून घेऊयात विराट कोहलीची वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी निवडलेल्या 12 मैदानांवरील कामगिरी काय ते…

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेची 12 मैदानं

दक्षिण आफ्रिकेतील वाँडरर्स स्टेडियम (जोहान्सबर्ग), सेंच्युरियन (त्वाने), न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंड (केपटाऊन), किंग्समीड क्रिकेट ग्राउंड (डर्बन), सेंट जॉर्जेस पार्क (ग्केबेरा), मंगांग ओव्हल (ब्लूमफॉन्टेन), बोलंड पार्क (पार्ल), बफेलो पार्क (कुगोम्पो सिटी) अशी आठ मैदानं आहेत. तर झिम्बाब्वेतील झिम्बाब्वे: हरारे स्पोर्ट्स क्लब (हरारे), क्वीन्स स्पोर्ट्स क्लब (बुलावायो), नवीन क्रिकेट स्टेडियम (व्हिक्टोरिया फॉल्स) अशी तीन मैदानं आहे. तर नामिबियात नवीन आंतरराष्ट्रीय स्टेडियम (विंडहोक)या स्पर्धेसाठी सज्ज आहे.

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेतील संघात विराट कोहली असणार यात काही शंका नाही. विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात आपली खेळी दाखवली आहे. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेत संघाचा भाग असेल आणि त्याच्याकडे असलेल्या अनुभवाचा संघाला नक्कीच फायदा होईल असं क्रीडाप्रेमी म्हणत आहेत. बारा पैकी आठ मैदानात विराट कोहलीने फलंदाजी केली आहे. तर चार मैदानात खेळलेला नाही. आठ मैदानात विराट कोहलीने 25 डाव खेळले आहेत. त्यात 71.47 च्या सरासरीने 1358 धावा केल्या आहेत. यात 4 शतकं आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. विराटला पाचवेळा सामनावीराचा पुरस्कारही मिळाला आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील प्रत्येक मैदानात विराटचा सर्वोत्तम स्कोअर

  • केपटाउन- 160 नाबाद
  • जोहान्सबर्ग- 75
  • सेंच्युरियन- 129 नाबाद
  • ग्केबेरा-87 नाबाद
  • बफेलो पार्क- खेळला नाही
  • ब्लूमफोन्टेन- खेळला नाही
  • डरबन- 112
  • पार्ल- 51
  • हरारे- 115
  • बुलावायो- 0
  • विक्टोरिया फॉल्स- खेळला नाही
  • विंडहोक- खेळला नाही

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल