द. आफ्रिकेविरुद्ध कुणाला संधी, प्लेइंग इलेव्हनमध्ये नवा चेहरा दिसणार?

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिकेत प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण असणार, याकडे क्रिकेटविश्वाचं लक्ष लागून आहे.

द. आफ्रिकेविरुद्ध कुणाला संधी, प्लेइंग इलेव्हनमध्ये नवा चेहरा दिसणार?
संजू सॅमसनकडे उपकर्णधारपद
Image Credit source: social
| Updated on: Sep 27, 2022 | 9:38 PM

नवी दिल्ली : भारतीय संघ बुधवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) तीन सामन्यांची टी-20 (T20) मालिका खेळणार आहे. याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. मालिकेतील शेवटचा सामना इंदूरमध्ये 4 ऑक्टोबरला होणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे. 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. संजू सॅमसन (Sanju Samson) वनडे मालिकेत संघात पुनरागमन करू शकतो, असंही बोललं जातंय. एवढेच नाही तर सॅमसनला उपकर्णधार बनवलं जाऊ शकतं. वनडे मालिकेसाठी काही दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. त्याचबरोबर शिखर धवन संघाची कमान सांभाळू शकतो.

चाहते प्रचंड संतापले

बीसीसीआयच्या सूत्रांनुसार सॅमसनला उपकर्णधार बनवले जाऊ शकतं. सॅमसनला T20 विश्वचषकासाठी दुर्लक्षित केल्यानंतर चाहते प्रचंड संतापले आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आनंदाची संधी मिळू शकते.

सॅमसन शेवटचा भारताकडून झिम्बाब्वे दौऱ्यावर खेळला होता. त्यानंतर भारतानं तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत झिम्बाब्वेचा 3-0 असा पराभव केला. सॅमसननं भारतासाठी सात एकदिवसीय आणि 16 टी-20 सामने खेळले आहेत.

संजू हा सध्या न्यूझीलंड अ विरुद्धच्या घरच्या मालिकेत भारत अ संघाचे कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारत-अ ने एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंड-अ चा 3-0 असा पराभव केला.

रजत पाटीदार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मध्य प्रदेशचा स्फोटक फलंदाज रजत पाटीदारलाही टीम इंडियात स्थान मिळू शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो नवा चेहरा असू शकतो. एवढेच नाही तर त्याला पदार्पणाची संधीही मिळू शकते.

शुभमन गिल

शुभमन गिलही टीम इंडियात पुनरागमन करू शकतो. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 28 सप्टेंबरला तिरुवनंतपुरममध्ये दुसरा T20 गुवाहाटीमध्ये 2 ऑक्टोबरला आणि शेवटचा T20 इंदूरमध्ये 4 ऑक्टोबरला खेळवला जाईल.

भारतीय संघः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर आणि जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर आणि शाहबाज अहमद.