AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक..! चेंडू वेगाने हेल्मेटवर आदळला आणि खेळाडू मैदानातच कोसळला, पुढे झालं असं की…

द हंड्रेड 2025 स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेतील 13 व्या सामन्यात एक धक्कादायक प्रकार मैदानात घडला. लंडन स्पिरिट आणि ट्रेंट रॉकेट्स या संघात सामना पार पडला. यावेळी ट्रेंट रॉकेट्सच्या एका फलंदाजाला गंभीर दुखापत झाली.

धक्कादायक..! चेंडू वेगाने हेल्मेटवर आदळला आणि खेळाडू मैदानातच कोसळला, पुढे झालं असं की...
धक्कादायक..! चेंडू वेगाने हेल्मेटवर आदळला आणि खेळाडू मैदानातच कोसळला, पुढे झालं असं की...Image Credit source: Getty Images
| Updated on: Aug 15, 2025 | 8:07 PM
Share

इंग्लंडमध्ये द हंड्रेड क्रिकेट लीग स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेतील 13वा सामना लंडन स्पिरिट आणि ट्रेंट रॉकेट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात लंडन स्पिरीटने 21 धावांनी विजय मिळवला. पण हा सामना एका घटनेमुळे चर्चेत राहिला. कारण या सामन्यात ट्रेंट रॉकेट्सचा यष्टीरक्षक फलंदाज टॉम अल्सोपला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला अर्ध्यातच डाव सोडावा लागला. ट्रेंट रॉकेट्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. लंडन स्पिरीटने 100 चेंडूत 5 गडी गमवून 162 धावा केल्या आणि विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं. पण या धावा करताना ट्रेंट रॉकेट्स 141 धावांवर थांबला. हा सामना लंडन स्पिरीटने 21 धावांनी जिंकला. खरं ट्रेंट रॉकेट्ससाठी टॉम बॅन्टम आणि जो रूट यांनी चांगली सुरुवात केली. पण 73 धावांवर विकेट पडली आणि घसरगुंडी सुरु झाली. मधल्या फळीत मार्कस स्टोइनिसने 35 धावा केल्या. पण इतर कोणीही तग धरू शकलं नाही. ट्रेंट रॉकेट्स संघाने 90 धावांवर चार विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे टॉम अल्सोप मैदानात उतरला. दोन चेंडू खेळला आणि तिसऱ्या चेंडूवर रिटायर्ड हर्ट होत तंबूत परतावं लागलं.

लंडन स्पिरिटचा वेगवान गोलंदाज जेमी ओव्हरटनने एक बाउन्सर टाकला, जो थेट अल्सोपच्या नाकावर लागला. विशेष म्हणजे अल्सोपने हेल्मेट घातले होते. तरीही चेंडू हेल्मेटच्या जाळी भेदून आत गेला आणि त्याच्या नाकाला जोरात लागला. वेदनेने अल्सोप कळवळू लागला आणि मैदानावरच झोपला. यावेळी त्याच्या नाकातून रक्त वाहू लागले. वैद्यकीय टीमने तात्काळ मैदानात धाव घेत त्याला मैदानाबाहेर नेले. त्याला रिटायर्ड हर्ट घोषित करण्यात आलं. त्याची स्थिती पाहून मैदानात भयाण शांतता पसरली होती. पण सुदैवाने गंभीर असं काही नव्हतं. आता त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, जेमी स्मिथने या सामन्यात सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. यासाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. कर्णधार केन विल्यमसनने 45 धावा आणि अ‍ॅश्टन टर्नरने 30 धावा केल्या. जेमी स्मिथ सामन्यानंतर आनंद व्यक्त सांगितलं की, ‘जिंकल्याचा खूप आनंद झाला. आम्ही खूप वेग घेतला. आम्ही विकेट घेत राहिलो. सुरुवात करणे सोपे नव्हते. काही धावा मिळवून आनंद झाला. विशेषतः नवीन संघासाठी.’

Follow Us
पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर प्रकरणावरून...
Delhi | पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर दानपेटी प्रकरणावरून दिल्लीत राजकीय रणकंदन
खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pune | खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
FDA ला हायकोर्टाचा दणका! 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
FDA ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयाच्या कँटीनमध्ये माश्या, धूळ; 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण...
Bhiwandi Building collapsed | भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण अजुनही ढिगाऱ्याखाली
लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
Rupali Thombare Patil | लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; चिमुकल्यांकडून पाय धुऊन घेतल्याप्रकरणी ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! दीपकेंचा आरोप
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन!
Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...