AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDA vs AFGA : अफगाणिस्तानसमोर टीम इंडियाचं आव्हान, सामना किती वाजता?

India A vs Afghanistan A Live Streaming : टीम इंडियाने तिलक वर्मा याच्या नेतृत्वात ट्राय सीरिजमध्ये यजमान श्रीलंकेला पराभूत करुन विजयी सलामी दिली होती. आता ब्लु आर्मी आपल्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध भिडणार आहे.

INDA vs AFGA : अफगाणिस्तानसमोर टीम इंडियाचं आव्हान, सामना किती वाजता?
Tilak Varma Tri Nation A Series 2026Image Credit source: @ACBofficials X Account
| Updated on: Jun 11, 2026 | 2:55 AM
Share

ट्राय नॅशन ए सीरिज 2026 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान (India A vs Afghanistan A) आमनेसामने असणार आहेत. टीम इंडियाचा हा स्पर्धेतील दुसरा तर अफगाणिस्तानचा पहिला सामना असणार आहे. तिलक वर्मा याच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा असणार आहे. तर इम्रान मीर अफगाणिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. या निमित्ताने इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए यांच्यातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना कधी?

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना गुरुवारी 11 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना कुठे?

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना दांबुल्यातील रनगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे. तर 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर लाईव्ह पाहायला मिळेल.

टीम इंडियाने पहिल्या सामन्यात काय केलं?

इंडिया ए टीमने या सीरिजमधील पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर मात केली होती. भारताने 9 जून रोजी श्रीलंकेवर अवघ्या 8 धावांनी विजय मिळवला होता. भारताने ऋतुराज गायकवाड याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 277 धावा केल्या होत्या. श्रीलंकेने 278 धावांचा पाठलाग करताना जबरदस्त अशी झुंज दिली होती. मात्र भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या टप्प्यात गेम फिरवला. भारताने श्रीलंकेला 48.5 ओव्हरमध्ये 269 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने अशाप्रकारे 8 धावांनी हा सामना जिंकत विजयी सलामी दिली होती. त्यामुळे आता भारतीय संघ तिलक वर्मा याच्या नेतृत्वात अफगाणिस्तान विरुद्ध सामना जिंकून विजयी घोडदौड कायम राखणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम