AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tri Nation A Series 2026 : टीम इंडिया ट्राय सीरिजसाठी सज्ज, वैभव सूर्यवंशी खेळणार, पहिला सामना किती वाजता?

India A vs Sri Lanka A : इंडिया ए टीमला ट्राय सीरिजमध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तान विरुद्ध प्रत्येकी 2-2 असे एकूण 4 सामने खेळायचे आहेत. टीम इंडियासमोर या मालिकेतील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेचं आव्हान आहे.

Tri Nation A Series 2026 : टीम इंडिया ट्राय सीरिजसाठी सज्ज, वैभव सूर्यवंशी खेळणार, पहिला सामना किती वाजता?
Vaibhav Sooryavanshi India AImage Credit source: MB Media/Getty Images
| Updated on: Jun 08, 2026 | 7:54 PM
Share

टीम इंडियाने 8 जून रोजी अफगाणिस्तानवर एकमेव कसोटी सामन्यात विजय मिळवला. आता उभयसंघात 13 जूनपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. त्याआधी 9 जूनपासून श्रीलंकेत ट्राय सीरिजचा थरार रंगणार आहे. ट्राय सीरिजमध्ये इंडिया ए, अफगाणिस्तान ए आणि श्रीलंका ए यांच्यात एकूण 7 सामन्यांचा थरार रंगणार आहे. प्रत्येक संघाला 4 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंका ए विरुद्ध इंडिया ए आमनेसामने असणार आहेत. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

श्रीलंका ए विरुद्ध इंडिया ए सामना कधी?

श्रीलंका ए विरुद्ध इंडिया ए यांच्यातील एकदिवसीय सामना मंगळवारी 9 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.

श्रीलंका ए विरुद्ध इंडिया ए सामना कुठे?

श्रीलंका ए विरुद्ध इंडिया ए सामना रनगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

श्रीलंका ए विरुद्ध इंडिया ए सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

श्रीलंका ए विरुद्ध इंडिया ए सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. तर 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

श्रीलंका ए विरुद्ध इंडिया ए सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

श्रीलंका ए विरुद्ध इंडिया ए सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

श्रीलंका ए विरुद्ध इंडिया ए सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

श्रीलंका ए विरुद्ध इंडिया ए सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

इंडिया ए टीमचं वेळापत्रक

पहिला सामना, विरुद्ध श्रीलंका ए, 9 जून

दुसरा सामना, विरुद्ध अफगाणिस्तान ए, 11 जून

तिसरा सामना, विरुद्ध श्रीलंका ए, 15 जून

चौथा सामना, विरुद्ध अफगाणिस्तान ए, 17 जून

अंतिम सामना, 21 जून.

वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष

तिलक वर्मा इंडिया ए टीमचं नेतृत्व करणार आहे. तर ऋतुराज गायकवाड याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर सहान अरच्चिगे श्रीलंका ए संघाच्या नेतृत्व करणार आहे. मात्र वैभव सूर्यवंशी याच्या बॅटिंगकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. वैभवचा इंडिया टीममध्ये निवड झाल्यानंतर हा पहिलाच सामना असणार आहे. त्यामुळे वैभव किती धावा करतो आणि कसं खेळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार