AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ट्रिस्टन स्टब्स भारतीय चाहत्यांवर भडकला, दुबेने षटकार मारल्यानंतर भर मैदानात घडलं असं काही

T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारतावर पराभवाची नामुष्की ओढावली. हा पराभव 76 धावांनी झाल्यानं सर्वच गणित बिघडलं आहे. असं असताना या सामन्यात एक प्रसंग असा घडला की, ट्रिस्टन स्टब्सला राग अनावर झाला. कसं काय ते जाणून घ्या

Video : ट्रिस्टन स्टब्स भारतीय चाहत्यांवर भडकला, दुबेने षटकार मारल्यानंतर भर मैदानात घडलं असं काही
ट्रिस्टन स्टब्स भारतीय चाहत्यांवर भडकला, दुबेने षटकार मारल्यानंतर भर मैदानात घडलं असं काहीImage Credit source: PTI
| Updated on: Feb 23, 2026 | 6:49 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील भारताचा विजयरथ अखेर दक्षिण अफ्रिकेने रोखला. साखळी फेरीत चार सामने जिंकून आलेल्या भारतीय संघाला सुपर 8 फेरीच्या पहिल्याच सामन्यात दणका बसला आहे. दक्षिण अफ्रिकेने भारताला 76 धावांनी पराभवाची धूळ चारली. पण या सामन्यात बरंच काही घडलं. एक प्रसंग असा आला की दक्षिण अफ्रिकन खेळाडू ट्रिस्टन स्टब्सला भारतीय चाहत्यांसोबत हुज्जत घालावी लागली. पण असं का झालं? भारतीय चाहत्यांवर रागवण्याचं कारण काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असणार आहे. ट्रिस्टन स्टब्स वाद घालत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओनुसार ट्रिस्टन स्टब्स स्टेडियमच्या स्टँडमध्ये बसलेल्या भारतीय चाहत्यांसोबत तू तू मै मै करताना दिसत आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर काय झालं ते?

भारतीय संघाच्या हातून सामना पूर्णपणे निघून गेला होता. शिवम दुबे शेवटच्या काही षटकात नेट रनरेट लक्षात घेऊन झुंज देत होता. तेव्हा कगिसो रबाडाचं षटक त्याला फायद्याचं ठरलं. या षटकात त्याने दोन षटकार मारले. तर एक षटकार मार्को यानसेनच्या गोलंदाजीवर मारला. हा चेंडू थेट स्टेडिमयमच्या स्टँडमध्ये गेला. या स्टँडमध्ये बहुतांश भारतीय चाहते बसले होते. षटकार मारलेला चेंडू आणण्यासाठी ट्रिस्टन स्टब्स जेव्हा गेला. तेव्हा त्याच्याकडे भारतीय चाहत्यांनी चेंडू दिलाच नाही. त्यामुळे ट्रिस्टन स्टब्स वैतागला. त्याने भारतीय चाहत्यांना खडे बोल सुनावले.

ट्रिस्टन स्टब्सचा विक्रम

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ट्रिस्टन स्टब्सच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे. एकाच षटचकात तीन झेल घेणारा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी विकेटकीपरच्या नावावर असा विक्रम होता. पण खेळाडू पहिल्यांदाच ठरला आहे. त्याने ही कामगिरी 15व्या षटकात केली. केशव महाराजच्या षटकात लाँग ऑन आणि लाँग ऑफला फिल्डिंग करताना हार्दिक पांड्या, रिंकु सिंह आणि अर्शदीप सिंहचा झेल पकडला. स्टब्सपूर्वी ही कामगिरी न्यूझीलंडचा विकेटकीपर मिशेलने 2024 मध्ये केली होती.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...