AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi: जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर दोन खतरनाक षटकार! मग काय केला विचार? वैभव सूर्यवंशीच्या उत्तराने सर्वच गारेगार

Vaibhav Suryavanshi Stunning Answer: या आयपीएलमध्ये अनेक विक्रमांची, षटकार, चौकारांची, गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची चर्चा होत आहे. पण सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती वैभव सूर्यवंशीने जसप्रीत बुमराह याच्या चेंडूवर चोपलेल्या षटकाराची. त्याने बुमराहला दोन षटकार हाणले, तेव्हा त्याच्या मनात कोणता विचार आला?

Vaibhav Suryavanshi: जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर दोन खतरनाक षटकार! मग काय केला विचार? वैभव सूर्यवंशीच्या उत्तराने सर्वच गारेगार
वैभव सूर्यवंशी, जसप्रीत बुमराहImage Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 09, 2026 | 3:27 PM
Share

Vaibhav Suryavanshi on Jasprit Bumrah: भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह याची गोलंदाजी अनेक दिग्गज खेळाडू अत्यंत सावधगिरीने खेळतात. त्याचा चेंडू कधी चकवा देऊन त्रिफळा उडवेल याचा काही नेम नसतो. तर अनेक खेळाडू त्याच्या चेंडूवर करायला नको ती चूक हमखास करतात. पण 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने या दिग्गज फलंदाजाच्या पहिल्याच चेंडूवर सणसणीत षटकार लगावला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दस्तूरखुद्द बुमराहला सुद्धा त्याने अचंबित केले. ज्या बुमराह पुढे जगातील फलंदाज चळचळ कापतात, त्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकल्याची एकच चर्चा सुरू आहे. आयपीएलच्या (IPL 2026) हंगामात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सविरोधातील तिसरा सामना आरामात खिशात घातला. त्यावेळी वैभवच्या फलंदाजीने अनेकांचे लक्ष वेधले.

वैभवच्या डोक्यात होते काय?

वैभवने या सामन्यात बुमराह याच्या चेंडूवर दोन षटकार ठोकले. त्याचा हा फटका पाहिल्यावर बुमराह सुद्धा आश्चर्यचकीत झाला. त्याला या नुकतंच मिसुरडं फुटलेल्या पोराचं कोण कौतुक वाटलं. बुमराहच्या गोलंदाजाची त्याच्यावर कोणताच परिणाम झालेला दिसला नाही. बुमराह याला जेव्हा षटकार हाणला, त्यावेळी वैभवच्या डोक्यात कोणता विचार होता. त्याला काय वाटते होते. याचे उत्तर त्यानेच दिले आहे.

“मी त्यावेळी इतकाच विचार करत होतो की मी गोलंदाज कोण आहे हे नाही पाहणार. केवळ त्याच्या चेंडूवर माझे लक्ष्य होते. मी थोडा निराश होतो की इतका तगडा गोलंदाज आपल्यासमोर आहे. पण मी माझी नैसर्गिक लय बिघडू दिली नाही. मी माझ्या लयीने खेळलो” अशी प्रतिक्रिया वैभव सूर्यवंशीने दिली आहे.

39 धावा कुटल्या

मुंबई इंडियन्सविरोधातील सामना हा पावसाने बाधित झाला. त्यानंतर वैभव सूर्यवंशीने 14 चेंडूत 39 धावांची तुफानी खेळी खेळली. हा सामना 11-11 षटकारांचा खेळण्यात आला. राजस्थानसाठी वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जायसवाल हे सलामीला उतरले. या दोघांनी मिळून 30 चेंडूत 80 धावा कुटल्या. राजस्थान रॉयल्ससाठी वैभवने जोरदार खेळी खेळली. त्याने बुमराह याला दोन षटकार ठोकले. तर यशस्वीने 32 चेंडूत 77 धावा काढल्या. या दोघांच्या दमदार खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्ससमोर 151 धावांचे लक्ष्य ठेवले. तर लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघ 11 षटकात 9 बाद 129 धावा करू शकला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...