SA vs IND Final : अंडर 19 वूमन्स वर्ल्ड कप फायनलमध्ये इंडिया-दक्षिण आफ्रिका आमनेसामने, महामुकाबला केव्हा?

South Africa Women U19 vs India Women U19 T20 World Cup Final Live Streaming : दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात विश्वविजेता होण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. जाणून घ्या या सामन्याबाबत सर्वकाही.

SA vs IND Final : अंडर 19 वूमन्स वर्ल्ड कप फायनलमध्ये इंडिया-दक्षिण आफ्रिका आमनेसामने, महामुकाबला केव्हा?
South Africa Women U19 vs India Women U19 T20 World Cup Final
Image Credit source: Icc X Account
| Updated on: Feb 01, 2025 | 8:29 AM

अंडर 19 वूमन्स टी20 वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत अखेर 16 संघांतून महाअंतिम सामन्यासाठी 2 संघ निश्चित झाले आहेत. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी शुक्रवारी 31 जानेवारीला अंतिम सामन्यात धडक दिली. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाचा अंडर 19 वूमन्स टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत पराभूत होण्याची ही एकूण आणि सलग दुसरी वेळ ठरली. तर गतविजेत्या टीम इंडियाने इंग्लंडचा धुव्वा उडवत सलग दुसऱ्यांचा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य आहेत. त्यामुळे उभयसंघात फायनलमध्ये चांगली रस्सीखेच पाहायला मिळू शकते. या महिअंतिम सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना रविवारी 2 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना बायुमास ओव्हल, क्वालालंपूर येथे होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता सुरुवात होईल. तर 11 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना मोबाईलवर पाहता येईल का?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

अंडर 19 वूमन्स टीम इंडिया : निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), गोंगडी त्रिशा, मिथिला विनोद, वैष्णवी शर्मा, जोशिता व्ही जे, जी कमलिनी, भाविका अहिरे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, शबनम एमडी शकील, आयुषी शुक्ला, धृती केसरी आणि आनंदिता किशोर आणि ईश्वरी अवसरे.

अंडर 19 वूमन्स दक्षिण आफ्रिका :  कायला रेनेके (कर्णधार), जेम्मा बोथा, सिमोन लॉरेन्स, फे काउलिंग, काराबो मेसो (विकेटकीपर), माईके व्हॅन वुर्स्ट, सेश्नी नायडू, लुयांडा नुझा, ॲश्लेग व्हॅन विक, मोनालिसा लेगोडी, न्थाबिसेंग निनी, डायरा लेगोडी, डायरा लेगोडी, न्थॅबिसेंग निनी, डायरा लेगोडी, रेन्सबर्ग आणि चॅनेल वेंटर.