IND vs NZ | टीम इंडियाचा विजयी ‘चौकार’, न्यूझीलंडवर 214 धावांनी मात

India U19 vs New Zealand Super 6 Match Highlights In Marathi | टीम इंडियाने न्यूझीलंडचा 214 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने या विजयासह सेमी फायनलचा दावा आणखी मजबूत केला आहे.

IND vs NZ | टीम इंडियाचा विजयी चौकार, न्यूझीलंडवर 214 धावांनी मात
| Updated on: Jan 30, 2024 | 8:29 PM

मुंबई | अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरुच आहे. टीम इंडियाने साखळी फेरीनंतर सुपर 6 राऊंडमध्येही विजयाने सुरुवात केली आहे. टीम इंडियाने विजयी चौकार लगावला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडवर सुपर 6 मधील पहिल्याच सामन्यात 214 धावांनी मिळवला. टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 296 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर न्यूझीलंडचं 81 धावांवर पॅकअप झालं. मुशीर खान याने ऑलराउंड कामगिरी केली. तर सौम्य पांडे याने 4 विकेट्स घेतल्या.

न्यूझीलंडची बॅटिंग

टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला तग धरता आला नाही. न्यूझीलंडकडून कॅप्टन ऑस्कर जॅक्सन याने सर्वाधिक 19 धावा केल्या. झॅक कमिंग 16, एलेक्स थॉम्पसन 12 आणि जेम्स नेल्सन याने 10 धावांचं योगदान दिलं. तिघे आले तसेच झिरोवर आऊट होऊन परत गेले. दोघांनी प्रत्येकी 7-7 धावा जोडल्या. एकाने 5 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून सौम्य पांडे याच्या व्यतिरिक्त मुशीर खान आणि राज लिंबानी या दोघांनी 2-2 विकेट घेतल्या. तर नमन तिवारी आणि अर्शीन कुलकर्णी या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

टीम इंडियाची बॅटिंग

त्याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने मुशीर खान याच्या शतकाच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 295 धावा केल्या. मुशीर खान याने 131 धावा केल्या. तर आदर्श सिंह याने 52 धावा केल्या. तर न्यूझीलंडकडून मेसन क्लार्क याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मुशीर खान याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

टीम इंडियाचा तिसऱ्यांदा 200 पेक्षा अधिक धावांनी विजय

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | ऑस्कर जॅक्सन (कॅप्टन), जेम्स नेल्सन, टॉम जोन्स, स्नेहिथ रेड्डी, लचलान स्टॅकपोल, ऑलिव्हर टेवाटिया, झॅक कमिंग, एलेक्स थॉम्पसन (विकेटकीपर), इवाल्ड श्र्युडर, रायन त्सोर्गस आणि मेसन क्लार्क.

टीम इंडिया प्लेईग इलेव्हन | उदय सहारण (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी आणि सौम्य पांडे.