IND vs NZ 1st ODI: Umran Malik ने 153 KMPH वेगाने टाकला चेंडू, कॉनवे-मिचेल पेसमुळे हैराण VIDEO

| Updated on: Nov 25, 2022 | 1:40 PM

IND vs NZ 1st ODI: उमरान मलिकने आज न्यूझीलंडच्या बॅट्समनना आपल्या वेगवान गोलंदाजीची दाहकता दाखवली.

IND vs NZ 1st ODI: Umran Malik ने 153 KMPH वेगाने टाकला चेंडू, कॉनवे-मिचेल पेसमुळे हैराण VIDEO
umran-Malik
Image Credit source: GETTY IMAGES
Follow us on

ऑकलंड: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने आज वनडे क्रिकेटमध्ये डेब्यु केला. उमरान मलिकवर आज टीम इंडियाने विश्वास दाखवला. तो या गोलंदाजाने सार्थ ठरवला. उमरान मलिकने आज डेब्यु वनडेमध्ये कमालीची गोलंदाजी केली. त्याने आपल्या वेगाने न्यूझीलंडच्या गोटात खळबळ उडवून दिली. त्याने आज विकेटचही खातं उघडलं. डेवॉन कॉनवे उमरान मलिकचा वनडे क्रिकेटमधील पहिला बळी ठरला. त्याला पंतकरवी कॅचआऊट केलं.

चेंडूला छेडण्याचा मोह नडला

उमरान मलिकने 16 व्या ओव्हरमध्ये डेवॉन कॉनवेला आऊट केलं. कॉनवे 24 धावा करुन क्रीजवर सेट झाला होता. उमरानने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. उमरानचा हा चेंडू ऑफ स्टम्पच्या खूप बाहेर होता. कॉनवेने चेंडूला छेडण्याच्या नादात आपली विकेट गमावली.

डॅरेल मिचेलला उमरानच्या वेगाने चकवलं

उमरान मलिकने न्यूझीलंडचा फलंदाज डॅरेल मिचेललाही चकवलं. मिचेलला उमरानच्या गोलंदाजीचा वेग समजला नाही. तो 11 धावांवर आऊट झाला. उमरानच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याने हुड्डाकडे झेल दिला. उमरानने खूप वेगात चेंडू टाकला होता. या वेगामुळेच मिचेल शॉट खेळताना लेट झाला.

उमरानच्या वेगाने फर्ग्युसनला टाकलं मागे

वेग ही उमरानच्या गोलंदाजीची ताकत आहे. आज ऑकलंडमध्ये त्याने ते सिद्ध केलं. उमरान मलिकने आज 153 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीचा सरासरी वेग 145 किमी प्रतितास होता. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या वेगापेक्षा हा स्पीड जास्त होता. या मॅचमध्ये फर्ग्युसनचा सरासरी वेग 143 किमी प्रतितास होता.