क्रिकेटविश्वात खळबळ! क्रिकेटपटू रेड्डी फिक्सिंगमध्ये दोषी, आयसीसीकडून 8 वर्षांची बंदी

क्रिकेटविश्वातून मॅच फिक्सिंगची बातमी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. क्रिकेटपटू रेड्डी फिक्सिंच्या आरोपात दोषी आढळल्याने आयसीसीने कारवाई केली आहे. चला जाणून घेऊयात नेमकं काय प्रकरण आहे?

क्रिकेटविश्वात खळबळ! क्रिकेटपटू रेड्डी फिक्सिंगमध्ये दोषी, आयसीसीकडून 8 वर्षांची बंदी
क्रिकेटविश्वात खळबळ! क्रिकेटपटू रेड्डी फिक्सिंगमध्ये दोषी, आयसीसीकडून 8 वर्षांची बंदी
Image Credit source: ICC
| Updated on: Aug 03, 2026 | 4:58 PM

क्रिकेटविश्वात गेल्या काही वर्षांपासून मॅच फिक्सिंगच्या घटनांना आयसीसीकडून वेसण घातलं आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात अशी प्रकरणं क्वचितच आढळून येतात. पण एखाद दुसरं प्रकरण समोर आलं की क्रीडावर्तुळात चर्चांना उधाण येतं. अशीच एक बातमी आता समोर आली आहे. अमेरिकन क्रिकेटपटू अखिलेश रेड्डी मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला आहे. त्यानंतर आयसीसीने कठोर नियमांची अमलबजावणी करत त्याच्यावर 8 वर्षांची बंदी घातली आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी न्यायाधिकरणाने अखिलेश रेड्डीला भ्रष्टाचारविरोधी संहितेच्या तीन कलमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. मॅच फिक्सिंगचं हे प्रकरणी युएईतील 2025 मध्ये पार पडलेल्या स्पर्धेतील आबुधाबी टी10 प्रकरणाशी निगडीत आहे. यासाठी एमीरेट्स क्रिकेट बोर्डाने आयसीसीचा भ्रष्टाचारविरोधी अधिकारी नियुक्त केला होता.

अखिलेश रेड्डीने काय केलं?

आयसीसीच्या रिपोर्टनुसार, अखिलेश रेड्डीवरील बंद 21 नोव्हेंबर 2025 पासून लागू होईल. या दिवशी रेड्डीचं तात्पुरतं निलंबन करण्यात आल आहे. आता त्याच्यावर आठ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्याच्या सर्व क्रिकेट उपक्रमांवर ही बंदी असणार आहे. अखिलेश रेड्डी आयसीसीच्या कलम 2.1.1, कलम 2.1.4 आणि कलम 2.4.7 मध्ये दोषी आढळला आहे. अबू धाबी T10 लीगमध्ये सामन्याचा निकाल आधीच ठरवणे, सामन्यात काहीतरी गडबड करणे किंवा खेळावर चुकीच्या पद्धतीने प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणे. तसेच अशा कोणत्याही फिक्सिंगच्या करारात किंवा कटात सामील असणे, असा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. दुसऱ्या खेळाडूला किंवा व्यक्तीला मॅच फिक्सिंग करण्यासाठी पैशांचे आमिष दाखवणे. इतकंच काय तर मोबाईलमधील चॅट्स, मेसेज किंवा महत्त्वाचा डेटा डिलीट करून तपास भरकटवणे, असेही आरोप आहेत.

अखिलेश रेड्डीची क्रिकेट कारकिर्द

अखिलेश रेड्डी आबुधाबी टी10 या स्पर्धेत अखिलेश रेड्डी एस्पिन स्टॅलिअन्स या संघाचा भाग होता. त्याने त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीत एकूण 4 टी20 सामने खेळले आहेत. त्यात गोलंदाजी करत एक बळी घेतला आहे. त्याला एकदाही फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्याने एप्रिल 2025 मध्ये ‘नॉर्थ अमेरिका टी20 कप’ स्पर्धेत केमन आयलंड्स विरुद्ध खेळताना अमेरिकेच्या राष्ट्रीय संघात पदार्पण केले होते. 2025 मध्ये अमेरिकेकडून 4 सामने खेळल्यानंतर या वर्षाच्या अखेरीस अबु धाबी टी10 लीगमध्ये फिक्सिंगच्या प्रकरणात अडकल्यामुळे त्याच्यावर 8 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us