Virat Kohli : विराट कोहली आणि गौतम गंभीर वादात पोलिसांची एन्ट्री, उत्तर प्रदेश पोलीस अॅक्शन मोडमध्ये!

या राड्यावर अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिल्या. या राड्याच्या सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. अशातच या वादामध्ये पोलिसांची एन्ट्री  झालेली पाहायला मिळत आहे.

Virat Kohli : विराट कोहली आणि गौतम गंभीर वादात पोलिसांची एन्ट्री, उत्तर प्रदेश पोलीस अॅक्शन मोडमध्ये!
| Updated on: May 04, 2023 | 3:32 PM

मुंबई :  आयपीएलमधील लखनऊ सुपर  जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्यावेळी झालेला राडा क्रिकेट जगताने पाहिला. लखनऊ संघाचा मेंटॉर गौतम गंभीर आणि आणि आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहली एकमेकांना पुन्हा एकदा भिडले. भर मैदानात झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर दोघांना दंड ठोठावण्यात आला. मात्र कुठेतरी जगातील प्रसिद्ध असलेल्या लीगला गालबोट लागलं. या राड्यावर अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिल्या. या राड्याच्या सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. अशातच या वादामध्ये पोलिसांची एन्ट्री  झालेली पाहायला मिळत आहे.

सर्वत्र या भांडणाची चर्चा होत आहे. क्रिकेट पाहत नसणारेसुद्धा नेमका हा राडा कसा झाला? याबाबत आवर्जुन विचारच आहेत. याच  पार्श्वभूमीवर आणि या वादाचा धागा पकडत उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये, आमच्यासाठी कोणतीच गोष्ट ‘विराट’ आणि गंभीर नाही. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये लगेच 112 नंबर डायल करा, असं म्हटलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांचं हे ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेलं दिसत आहे.

 

दरम्यान, विराट कोहली आणि गौतम गंभीर हे पुन्हा 10 वर्षांनी एकमेकांना भिडले. याआधी दोघेांमध्ये 2013 मध्ये कडाक्याचं वाजलं होतं. त्यानंतर आता हे दोघे आमनेसामने आले होते. या दोघांनी एकमेकांवर हात उगारायचाच राहिला होता, बाकी सर्व काही झालं होतं.

आरसीबीने  संघाने सामन्यात विजय मिळवला होता. यंदाच्या पर्वात दोनवेळा लखनऊ आणि आरसीबी एकमेकांसमोर आले होते. यामध्ये पहिल्या सामन्यात लखनऊने तर दुसऱ्या सामन्यात आरसीबीने विजय मिळवत हिसाब बरोबर केला.