IPL 2026: वैभव सूर्यवंशीने आणखी एक विक्रम मोडला! टी20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Vaibhav Sooryavanshi: आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने सर्वांचं मनोरंजन केलं. या स्पर्धेच्या शेवटच्या लीग सामन्यात त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. पण एका मोठा विक्रम तोडण्यात यशस्वी ठरला.

आयपीएल 2026 स्पर्धेत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीची छाप सोडली. त्याच्या फलंदाजीच्या प्रेमात अनेक क्रीडाप्रेमी पडले आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. पण साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. त्याने सहा चेंडूंचा सामना केला आणि 4 धावा करून बाद झाला. पण या छोट्या खेळीतही त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. एका टी20 स्पर्धेत किंवा मालिकेत सर्वाधिक धावा करणारा कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम देवदत्त पडिक्कलच्या नावावर होता. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी हा विक्रम मोडण्यासाठी वैभव सूर्यवंशीला 2 धावांची आवश्यकता होती. त्याने पहिल्या चेंडूवर खातं खोललं आणि पुन्हा विल जॅक्सच्या गोलंदाजीवर दुसरी धाव घेऊन हा विक्रम आपल्या नावावर केला.
देवदत्त पडिक्कलने 2019-20 सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत कर्नाटकसाठी 12 सामन्यात 580 धावा केल्या होत्या. आता वैभव सूर्यवंशीने देवदत्त पडिक्कला मागे टाकत पहिलं स्थान गाठलं आहे. त्याने एका टी20 स्पर्धेत किंवा मालिकेत 580हून अधिक धावा केल्या आहेत. वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 स्पर्धेतील 14 सामन्यात एकूण 583 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीने या खेळीत एक शतक आणि तीन अर्धशतकं ठोकली. विशेष म्हणजे त्याने या धावा 232.27च्या स्ट्राईक रेटने केल्या आहे. हा स्ट्राईक रेट टॉप 10 मधील फलंदाजांपेक्षा अधिक आहे. वैभव सूर्यवंशीने आता आयपीएल 2026 मध्ये 583 धावा केल्या आहेत. वैभव ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर आहे.
100हून अधिक चौकार षटकार मारले
वैभव सूर्यवंशीने या पर्वात 500हून अधिक धावा या चौकार आणि षटकारांनी मारल्या. या पर्वात त्याने 50 चौकार आणि 53 षटकार मारले. म्हणजेच 583 पैकी 518 धावा या चौकार आणि षटकाराने मारल्या. त्याच्या शिवाय कोणत्याही खेळाडूने चौकार-षटकारांच्या साहाय्याने इतक्या धावा केलेल्या नाहीत. आयपीएल 2026 स्पर्धेत षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, आयपीएल 2025 आणि 2026 मध्ये दीपक चहरने वैभवला पाच चेंडू टाकले आहेत. यापैकी तीन चेंडू निर्धाव होते, तर दोन चेंडूंवर दोन धावा निघाल्या. दीपकने वैभवला दोनदा बादही केले आहे. वैभवला चहरविरुद्ध चौकार किंवा षटकार मारता आलेला नाही.