AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यशस्वी जयस्वाल 27 धावा करून बाद पण रोहित शर्माचा विक्रम मोडला, पहिल्या षटकात केली अशी कामगिरी

आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आपला शेवटचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळत आहे. हा सामना राजस्थानसाठी करो या मरो अशा स्थितीत आहे. असं असताना या सामन्यातील पहिल्या षटकात यशस्वी जयस्वालने एक विक्रम रचला.

यशस्वी जयस्वाल 27 धावा करून बाद पण रोहित शर्माचा विक्रम मोडला, पहिल्या षटकात केली अशी कामगिरी
यशस्वी जयस्वाल 27 धावा करून बाद पण रोहित शर्माचा विक्रम मोडला, पहिल्या षटकात केली अशी कामगिरीImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 24, 2026 | 5:12 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या प्लेऑफच्या चौथ्या जागेसाठी तीन संघात चुरस आहे. राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स आणि केकेआर यांच्यात रस्सीखेंच आहे. पण राजस्थान रॉयल्सचा पराभव झाला तर पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला संधी मिळू शकते. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स सामन्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला आणि राजस्थानच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. या सामन्यात राजस्थान रॉयल्सची सुरूवात निराशाजनक राहिली. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल स्वस्तात बाद झाले. यशस्वी जयस्वालने 17 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकार मारत 27 धावांची खेळी केली आणि बाद झाला. त्याने या खेळीत मारलेल्या तीन पैकी पहिला षटकार महत्त्वाचा ठरला. या षटकारासह त्याने रोहित शर्माचा एक मोठा विक्रम मोडीत काढला.

पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार जयस्वालच्या नावावर

आयपीएल स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना यशस्वी जयस्वालने एक विक्रम रचला. दीपक चाहर पहिलं षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर यशस्वीने षटकार मारला. यास ह लीग स्पर्धेत पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. यशस्वी जयस्वालने राजस्थान रॉयल्ससाठी ही कामगिरी 14व्यांदा केली. रोहित शर्माने यापूर्वी 13 वेळा पहिल्या षटकात षटकार मारला आहे. त्यामुळे लीग स्पर्धेत पहिल्या षटकात षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर घसरला आहे. तिसऱ्या क्रमांकावर वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल आणि विराट कोहली आहे. या तिघांनी प्रत्येकी 12 षटकार मारले आहेत.

यशस्वी जयस्वालने या पर्वातील साखळी फेरीत खेळलेल्या 14 सामन्यात 397 धावा केल्या आहेत. या सामन्यात त्याने 33.08 च्या सरासरीने आणि 159.43 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वालने तीन सामन्यात अर्धशतकी खेळी केली आहे. तर नाबाद 77 धावांची खेळी सर्वोत्तम ठरली. यात त्याने 48 चौकार आणि 18 षटकार मारले आहे. यशस्वी जयस्वाल राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Follow Us
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात