AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs KKR : व्यंकटेश अय्यर याच्या एका शतकाने रचले अर्धाडजन रेकॉर्ड, रोहित शर्माचाही मोडलाय रेकॉर्ड

आयपीएलमधील यंदाच्या पर्वात शतक करणारा दुसरा तर पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. इतकंच नाहीतर पठ्ठ्याने या शतकासह मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केल्या आहेत.

MI vs KKR : व्यंकटेश अय्यर याच्या एका शतकाने रचले अर्धाडजन रेकॉर्ड, रोहित शर्माचाही मोडलाय रेकॉर्ड
| Updated on: Apr 16, 2023 | 6:49 PM
Share

मुंबई :  मुंबई इंडिअन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामधील सामन्यामध्ये आज व्यंकटेश अय्यर याचं वादळ वानखेडेवर घुमलं. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना प्रथम 185 धावा केल्या. यामध्ये एकट्या अय्यरने 104 धावांची दमदार खेळी केली. आयपीएलमधील यंदाच्या पर्वात शतक करणारा दुसरा तर पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. इतकंच नाहीतर पठ्ठ्याने या शतकासह मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केल्या आहेत.

आयपीएलच्या इतिहासामध्ये केकेआरच्या दुसऱ्याच खेळाडूने शतक केलं आहे. आयपीएलच्या पहिल्या पर्वामध्ये 2008 साली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ब्रेंडन मॅक्क्युलमने 158 धावा केल्या होत्या. त्यानंतर एकाही खेळाडूला शतकी खेळी करता आली नव्हती. मात्र हा शतकाचा दुष्काळ अय्यरने संपवला आहे.

अय्यरने या शतकासह रोहित शर्माचाही रेकॉर्ड मोडला आहे. 49 बॉलमध्ये अय्यरने 9 षटकार आणि 6 चौकार मारले. रोहित शर्माने केकेआरविरूद्ध 12 मे 2012 ला शतक केलं होतं. मात्र 49 बॉलमध्येच अय्यरने शतक पूर्ण केलं.

केकेआरकडून शतक करणारा व्यंकटेश अय्यर दुसरा खेळाडू ठरला आहे.  ब्रेंडन मॅक्क्युलमनंतर 15 वर्षांमध्ये कोणालाही शतक करता आलं नव्हतं. अय्यर सर्वात कमी चेंडूत शतक करणारा आयपीएलमधील 18 वा खेळाडू ठरला आहे.

व्यंकटेश 49 चेंडूत शतक करणारा तो दुसरा खेळाडू आहे. याआधी वृद्धीमान साहाने 1 जून 2014 ला केकेआरविरूद्ध शतक केलं होतं. 16 व्या पर्वामध्ये शतक करणार अय्यर दुसरा खेळाडू तर पहिला भारतीय खेळाडू आहे.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), इशान किशन, कॅमरन ग्रीन, टिळक वर्मा, नेहल वढेरा, टिम डेविड, अर्जुन तेंडुलकर ऋतिक शौकीन, पियूष चावला, रिले मेरेडिथ आणि ड्वेन जॉनसन.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, नारायण जगदीशन, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.