AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 | MI vs KKR : लेट पण थेट! अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणाच्या मॅचसोबत सचिन तेंडुलकरचं खास कनेक्शन, जाणून घ्या

कोलकाता संघ प्रथम फलंदाजीला उतरलेला असून मुंबईकडून अर्जुन तेंडुलकर याने पहिली ओव्हर टाकली, यामध्ये त्याने 5 धावे दिल्या. अर्जुनच्या पदार्पण सामन्यासोबत सचिन तेंडुलकर याचं खास कनेक्शन आहे. 

IPL 2023 | MI vs KKR : लेट पण थेट! अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणाच्या मॅचसोबत सचिन तेंडुलकरचं खास कनेक्शन, जाणून घ्या
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Apr 16, 2023 | 5:06 PM
Share

मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि  कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये आयपीएलमधील 22 वा सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये मुंबईकडून अर्जुन तेंडुलकर याने पदार्पण केलं असून त्याला अर्षद खान याच्या जागेवर संघात सामील करून घेण्यात आलं आहे. कोलकाता संघ प्रथम फलंदाजीला उतरलेला असून मुंबईकडून अर्जुन तेंडुलकर याने पहिली ओव्हर टाकली, यामध्ये त्याने 5 धावे दिल्या. अर्जुनच्या पदार्पण सामन्यासोबत सचिन तेंडुलकर याचं खास कनेक्शन आहे.

मुंबईचं वानखेडे स्टेडिअम सर्वांना माहित आहे. या स्टेडिअममध्ये अनेक मोठे सामने झालेले सर्वांना पाहिले आहेत.  2011 साली महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली जिंकलेला फायनल सामनाही वानखेडे मैदानावर झाला होता. सचिनच्या कनेक्शनबद्दल बोलायचं झालं तर त्याने आयपीएलमधील शेवटचा सामना याच मैदानावर खेळला होता. 13 मे 2013 रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध तेंडुलकरने 31 चेंडूत 38 धावा केल्या. दुखापतीनंतर त्याने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता.

याच मैदानावर आज अर्जुन तेंडुलकर याने पदार्पण केलं आहे. कोलकाताविरूद्ध अर्जुन आयपीएलमधील आपला पहिला सामना खेळत आहे. रोहित शर्माने अर्जुनला कॅप देत त्याचं अंतिम 11 मध्ये स्वागत केलं. मुंबईचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आधीच या सामन्यातून बाहेर पडला आहे. जोफ्रा आर्चर 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध संघाचा पहिला सामना खेळला होता परंतु दुखण्यामुळे तो त्यानंतरच्या सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सच्या संघात जोफ्रा आर्चरच्या जागी अर्जुन तेंडुलकरला संधी मिळाली आहे.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), इशान किशन, कॅमरन ग्रीन, टिळक वर्मा, नेहल वढेरा, टिम डेविड, अर्जुन तेंडुलकर ऋतिक शौकीन, पियूष चावला, रिले मेरेडिथ आणि ड्वेन जॉनसन.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, नारायण जगदीशन, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच