Hardik Pandya: हार्दिक पांड्याने एका झटक्यात जिंकले 95 लाख! पण पुढे कुणाला वाटलं नव्हतं असं काही घडलं, Video Viral
Hardik Pandya News: हार्दिक पंड्याने नुकतेच ९५ लाख रुपये जिंकले, पण हार्दिकने मध्येच इतकी रक्कम कशी काय जिंकली ते पाहा...

मिस्टर बीस्टने नुकताच भारत दौरा केला, जिथे त्याने भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबत एका बेसबॉल चॅलेंजमध्ये भाग घेतला. विजेत्याला १,००,००० अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस देण्यात आले. जगातील सर्वात मोठा यूट्यूबर, मिस्टर बीस्टसुद्धा त्या क्रिकेटपटूच्या बेसबॉल शॉटने आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला की, हा हार्दिकचा पहिलाच शॉट होता असे कोणीही म्हणू शकले नसते.
भारत दौऱ्यादरम्यान, मिस्टर बीस्टने रणबीर कपूरची भेट घेतली आणि आग्रा येथील ताजमहालला भेट दिली. त्याने हार्दिक पांड्यासोबत एका बेसबॉल चॅलेंजमध्ये भाग घेतला, ज्यात त्याच्या आणि त्या क्रिकेटपटूमध्ये एक सामना होता. बेसबॉल शॉटने चेंडू तीन वेळा स्टेडियमच्या बाहेर मारणे हे त्याचे उद्दिष्ट होते. हार्दिक पांड्याने हे चॅलेंज जिंकले.
Hardik Pandya × Mr Beast🔥
Hardik won the challenge and the amount $100,000
Hardik chose to donate the money to underprivileged children and provide care for stray dogs❤️
What a lovely gesture by him🥹
@hardikpandya7 https://t.co/pQVglpeBug
— Rohan Gangta (@rohangangta) October 31, 2026
मिस्टर बीस्टने सांगितले की तो लहानपणी बेसबॉल खेळायचा आणि त्याच्याकडे थोडे कौशल्य होते. हार्दिकने सांगितले की त्याने यापूर्वी कधीही बेसबॉल खेळला नव्हता. त्याने मारलेला पहिला शॉट स्टेडियमच्या बाहेर गेला नाही, पण तो सीमारेषेच्या अगदी जवळ होता. हार्दिक पांड्याने तीन वेळा चेंडू स्टेडियमच्या बाहेर मारून चॅलेंज जिंकले आणि १,००,००० अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस मिळवले. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे ९५ लाख रुपये आहे. पण या पैसाचे त्यानं जे केलं त्यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. मिस्टर बीस्टने दिलेल्या वृत्तानुसार, या भारतीय क्रिकेटपटूने जिंकलेले सर्व पैसे दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
हार्दिक पांड्या दुखापतीतून पूर्णपणे बरा न झाल्यामुळे बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. तो सध्या त्याच्या आयपीएल संघामुळे चर्चेत आहे. वृत्तांनुसार, तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून कायम राहू शकतो. यापूर्वी, तो ट्रेडद्वारे मुंबई सोडून दुसऱ्या संघात जाऊ शकतो, असे वृत्त होते. अनेक संघ हार्दिकला आपल्या टीममध्ये सामील करुन घेण्यासाठी उत्सुक आहेत. हार्दिकची दुखापत ही भारतीय संघासाठी मोठी समस्या बनत आहे. तो आता आयपीएलमध्ये पुनरागमन करेल असं म्हटले जात आहे. पण यापूर्वी भारतीय संघाच्या अनेक महत्त्वपूर्ण दौऱ्यातून त्याला खेळता येत नाहीये.
