AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: विराट कोहलीची शतकी खेळी आणि नोंदवले एकूण 11 विक्रम! जाणून घ्या

विराट कोहली आणि विक्रम हे आता एक समीकरण आहे. विराट कोहली आता एका अशा वळणावर उभा आहे, जिथे त्याची प्रत्येक धाव विक्रमाची नोंद करत आहे. असं असताना केकेआरविरुद्धच्या सामन्यात त्याने केलेल्या शतकी खेळीमुळे 11 विक्रम नोंदवले गेले आहेत.

IPL 2026: विराट कोहलीची शतकी खेळी आणि नोंदवले एकूण 11 विक्रम! जाणून घ्या
IPL 2026: विराट कोहलीची शतकी खेळी आणि नोंदवले एकूण 11 विक्रम! जाणून घ्याImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 14, 2026 | 5:00 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत विराट कोहलीने आपल्या पहिल्या शतकी खेळीची नोंद केली आहे. सलग दोन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर विराट कोहलीच्या बॅटमधून शतक आलं आहे. केकेआरविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 60 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकार मारत नाबाद 105 धावांची खेळी केली आहे. त्याने 175 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत. या खेळीसह विराट कोहलीने अनेक विक्रम नोंदवले आहेत. चला जाणून घेऊयात त्याबाबत

  1. विराट कोहलीने आयपीएल कारकिर्दीतील नववं शतक झळकावलं आहे. यासह शतकवीरांच्या यादीत आपलं पहिलं स्थान आणखी पक्क केलं आहे. या यादीत जोस बटलर 7 शतकांसह दुसऱ्या आणि ख्रिस गेल सहा शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
  2. टी20 क्रिकेटमध्ये 14 हजार धावांचा पल्ला ओलांडणारा विराट कोहली जगातील सहावा फलंदाज ठरला आहे. तसेच अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला आहे.
  3. विराट कोहलीने टी20 क्रिकेटमध्ये 14 हजारांचा पल्ला गाठण्यासाठी 409 डाव घेतले. हा एक विश्वविक्रम आहे. यापूर्वी ख्रिस गेलने 423 डावात हा पल्ला गाठला होता.
  4. विराट कोहलीचा आयपीएल स्पर्धेतील 279 वा सामना होता. त्याने महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यांना मागे टाकले आहे. या दोघांनी प्रत्येकी 278 सामने खेळले आहेत. आता रोहित आणि विराट यांच्यात स्पर्धा असणार आहे.
  5. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 12 पर्वात 400पेक्षा जास्त धावा करणारा विराट कोहली हा एकमेव फलंदाज आहे.
  6. विराट कोहलीने आयपीएल स्पर्धेत 21व्यांदा सामनावीराचा पुरस्कार पटकावला. असं करताच त्याने रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
  7. आयपीएल स्पर्धेत दुसऱ्या डावात म्हणजेच धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीचं तिसरं शतक आहे. त्याने जोस बटलरच्या विक्रमाशी बरोबरी केली.
  8. टी20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीचं हे 10 शतक आहे. यासह टी20 क्रिकेट इतिहासात शतकांचा दुहेरी आकडा गाठणारा एकमेव भारतीय फलंदाज ठरला आहे.
  9. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएलमध्ये नवव्यांदा 50हून अधिक धावा करून रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नरचा विक्रम मोडीत काढला.
  10. रायपूरच्या मैदानात टी20 सामन्यात फलंदाजाने केलेल्या सर्वोच्च धावांचा मान विराट कोहलीला मिळाला आहे. कोहलीने या सामन्यात नाबाद 105 धावा केल्या.
  11. विराट कोहलीने शतकी खेळी करण्यापूर्वी दोन वेळा शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर पुढच्या सामन्यात शतक ठोकणारा विराट कोहली आयपीएलमधील पहिला फलंदाज ठरला.

Follow Us
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा:सुळेंचं लांडगेंना थेट आव्हान
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजार...
Devendra Fadnavis : CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजारांहून अधिक तरुणांची उपस्थिती
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! गणेशोत्सवासाठी कोकण...
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोफत बससेवा
राष्ट्रवादीचा अखेरचा पत्ता उलगडणार? कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक
राष्ट्रावादी अखेरचा पत्ता उलगडणार? एकाच आठवड्यात सलग बैठका, विलिनिकरणाबाबत....
आयकर विभागाची मोठी कारवाई! 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
आयकर विभागाची मोठी कारवाई! तब्बल 2143 कोटी... 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! पुण्यातील सुप्रिसिद्ध...
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! बऱ्याच काळापासूनची पुण्यातील प्रसिद्ध खाऊगल्ली बंद?
'सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार' गोरेंचं विधान
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार- जयकुमार गोरे
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला...
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला; बदाम, पिस्त्याच्या दरात ३०० रुपयांपर्यंत वाढ
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको