AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : नवीन उल हक याला नेमका कसला इतका माज? सामन्यानंतरही तो विराट कोहलीला नडला, Video आला समोर!

अफगाणिस्तानचा नवीन उल हकपासून मैदानात खटके उडायला सुरूवात झाली होती. सामना झाल्यावरही नवीन उल हकने विराट कोहली याचा डिवचल्याच्या व्हिडीओ समोर आला आहे.

Video : नवीन उल हक याला नेमका कसला इतका माज? सामन्यानंतरही तो विराट कोहलीला नडला, Video आला समोर!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 02, 2023 | 10:25 AM
Share

मुंबई :  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सोमवारी झालेल्या सामन्यामध्ये  एका अर्थान गदरोळच झालेला पाहायला मिळाला. स्टार खेळाडू विराट कोहली आणि गौतम गंभीर दोघे एकमेकांना भिडलेले दिसले. काही वेळ मैदानामध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. एकवेळ अशी होती की आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू एकमेकांना मारहाण करतात की असं सर्वांना वाटू लागलं होतं. अफगाणिस्तानचा नवीन उल हक मैदानात फलंदाजी करायला आल्यापासून खटके उडायला सुरूवात झाली होती. सामना झाल्यावरही नवीन उल हकने विराट कोहली याचा डिवचल्याच्या व्हिडीओ समोर आला आहे.

पाहा व्हिडीओ- 

सामना संपल्यावर हस्तांदोलन करताना विराट आणि नवीन उल हकमध्ये खरखर झाली. तिथूनच जास्त तापलं आणि विराट गंभीर एकमेकांना भिडले. ज्यावेळी गंभीर आणि कोहली एकमेकांना भिडले त्यावेळी अमित मिश्राने मध्यस्थी करत दोघांना दूर केलेलं पाहायला मिळालं.  त्यानंतर के.एल. राहुल आणि विराट कोहली एकमेकांशी बोलत असताना तिथून नवीन जात होता.  के.एल. राहुलने त्याला बोलावलं होतं पण त्याने विराटसोबत बोलण्यास नकार दिला आणि निघून गेला.

नवीनने शांतपणे न जात त्याने विराटला खून्नस देत पाहिलं मग काय विराट शांत बसणार आहे का?  पण राहुल तिथे असल्याने जास्त काही वाढलं नाही. विराट कोहलीचा स्वभाव सर्व क्रिकेट जगताला माहित आहे. नवीनने सामना संपल्यावरसुद्धा अशा प्रकारे वागणं म्हणजे शांत झालेलं प्रकरण आणखी वाढवल्यासारखं आहे.

विराट आणि गंभीर याआधीही 2013 साली एकमेकांना भिडलेले पाहायला मिळाले होते. त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा गौतम गंभीर कर्णधार होता.  विराट आणि गौतमधील हे वैर अजूनही कायम आहे. फक्त आता काही निमित्त होतं आणि दोघे एकमेकांना भिडतात. मात्र यामुळे क्रिकेटची प्रतिमा मलिन होत असून यामधील दोषी खेळाडूंवर कारवाई करणं गरजेचं आहे.

Follow Us
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी