Virat Kohli : विराट कोहलीनं टेस्टची कॅप्टनसी सोडली, टीम इंडियाची धुरा कुणाकडं; रोहित की राहुल आणखी कोण? बीसीसीआयपुढं पेचप्रसंग

| Updated on: Jan 16, 2022 | 12:51 PM

टी-20 पाठोपाठ विराट कोहलीने (Virat Kohli resign) कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आहे. त्याने टि्वटवर पोस्ट करुन कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. कालच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी (south Africa test) मालिकेत भारताचा 2-1 ने पराभव झाला होता.

Virat Kohli : विराट कोहलीनं टेस्टची कॅप्टनसी सोडली, टीम इंडियाची धुरा कुणाकडं; रोहित की राहुल आणखी कोण? बीसीसीआयपुढं पेचप्रसंग
विराट कोहली
Follow us on

नवी दिल्ली : टी-20 पाठोपाठ विराट कोहलीने (Virat Kohli resign) कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आहे. त्याने टि्वटवर पोस्ट करुन कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. कालच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी (south Africa test) मालिकेत भारताचा 2-1 ने पराभव झाला होता. विराट कोहलीनं राजीनामा दिल्यानंतर टीम इंडियाचा कसोटी कॅप्टन कोण असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्यस्थिती टीम इंडियामध्ये कॅप्टनपद भूषवेल असा खेळाडू नाही. विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर कॅप्टनपद रोहित शर्मा की के. एल. राहुल यांच्याकडे जाणार अशी चर्चा सुरु झालेय. रोहित शर्मा पुढील चार ते पाच वर्ष कसोटी क्रिकेट खेळेल का? असा प्रश्न निर्माण झालाय. तर, के. एल. राहुलकडे कर्णधार म्हणून काम केल्याचा अनुभव कमी असल्यानं बीसीसीआयपुढे (BCCI) नवा प्रश्न निर्माण झालाय.

विराट कोहलीचं ट्विट

विराट कोहलीच्या राजीनामा, नवा कॅप्टन कोण?

विराट कोहलीनं राजीनामा दिल्यानंतर टीम इंडियाचा कसोटी कॅप्टन कोण असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्यस्थिती टीम इंडियामध्ये कॅप्टनपद भूषवेल असा खेळाडू नाही. रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांची नाव चर्चेत आहेत. मात्र, रोहित शर्मा पुढील चार ते पाच वर्ष कसोटी क्रिकेट फिटनेसच्या कारणामुळं खेळेल का? असा सवाल आहे. तर, दुसरीकडे के. एल. राहुल याच्याकडं कर्णधारपद भूषवल्याचा अनुभव कमी आहे.

बीसीसीआयशी वाद?

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराटने पत्रकार परिषद घेतली होती. त्यात कर्णधारपदाच्या विषयावर त्याने भाष्य केलं होतं. त्यावरुन बराच वाद झाला होता. टी-20, आणि वनडेची कॅप्टनशिप सोडू नको, असे आपण विराटला सांगितले होते. असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले होते. पण बीसीसाआयकडून कोणीही आपल्याला कॅप्टनशिप सोडताना अडवलं नाही असं विराटने सांगितलं. त्यामुळे विराट आणि सौरव यांच्या नेमकं खरं कोण बोलतय? असा प्रश्न निर्माण झाला होता.

विराट कोहलीनं टी 20 क्रिकेटचं कॅप्टनपद सोडल्यानंतर तो वनडेचं कर्णधार पद भूषवतं होता. मात्र, बीसीसीआयनं वनडेच्या कॅप्टनपदावरुन विराट कोहलीला हटवलं. त्यानंतर विराट कोहलीनं स्वत:हून कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे चर्चांना उधान आलंय.

विराट कोहलीनं कर्णधार म्हणून काम करताना टीम इंडियाला 40 मॅचेसमध्ये विजय मिळवून दिला. तर, कॅप्टन म्हणून 24 सेंच्युरी केल्या आहेत. कॅप्टन म्हणून त्यानं 5864 धावा केल्या आहेत. विराट कोहलीची ही कामगिरी टीम इंडियाच्या इतर कर्णधारांपेक्षा सरस ठरलीय.

इतर बातम्या:

Virat Kohli Resign: विराटच्या राजीनाम्यानंतर सुनील गावस्करांच अत्यंत स्फोटक विधान

Virat Kohli Test Captaincy : Shocked!! विराटच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर रोहित शर्माची रिअ‍ॅक्शन…

Virat Kohli step down from test captaincy who will next captain Rohit Sharma or K L Rahul BCCI facing problem