Virat Kohli Test Captaincy : Shocked!! विराटच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर रोहित शर्माची रिअ‍ॅक्शन…

Virat Kohli Test Captaincy : Shocked!! विराटच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर रोहित शर्माची रिअ‍ॅक्शन...
Rohit Sharma, Virat Kohli

विराटचा संघातील सहकारी आणि विराटनंतर ज्याच्या खांद्यावर कसोटी संघाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते अशा रोहित शर्माला विराटच्या या निर्णयाचा धक्का बसला आहे. रोहितने याबाबत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Jan 16, 2022 | 11:50 AM

मुंबई : विराट कोहलीने (Virat kohli step down as captain) भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा रविवारी केली. गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली विरुद्ध बीसीसीआय (Bcci) असे चित्र निर्माण झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. सर्वात आधी विराट कोहलीने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्याला ते सोडू नको असे सांगितले असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्याचवेळी बीसीसीआयने त्याच्याकडील एकदिवसीय संघाचेही कर्णधारपद काढून घेतले, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी यावरून मोठा हायव्होल्टेज ड्रामा झाल्याचेही पाहायला मिळाले.महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर गेल्या सात वर्षापासून विराट कोहली कर्णधार होता.

दरम्यान, विराटचा संघातील सहकारी आणि विराटनंतर ज्याच्या खांद्यावर कसोटी संघाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते अशा रोहित शर्माला विराटच्या या निर्णयाचा धक्का बसला आहे. रोहितने याबाबत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. रोहितने विराटसोबतचा फोटो पोस्ट केला आहे, कॅप्शनमध्ये रोहितने लिहिली आहे की, “मला आश्चर्य वाटते. पण, भारतीय कर्णधार म्हणून यशस्वी कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.”

कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मा टेस्ट फॉरमॅटमध्ये कर्णधार होण्याचा दावेदार आहे. मात्र, बीसीसीआयला याबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. कसोटी कर्णधार होण्याच्या शर्यतीत केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांचीही नावे पुढे येत आहेत.

भारतीय क्रिकेट टीममध्ये दुफळी?

काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मा कर्णधार टी-20 आणि वनडेचा कर्णधार झाला होता. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी विरोट कोहली काही सामने खळणार नसल्याचे उधाण आले, त्यानंतर तो खेळणार नाही अशी कोणतीही माहिती मी बीसीसीआयला दिली नाही, असे विरोट कोहलीने पत्रकार परिषद घेत सांगितले, त्यानंतर मोठा संभ्रम निर्माण झाला. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधीच कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला, त्यानंतर विराटला रोहितच्या नेतृत्वात खेळायचे नाही आणि रोहितला विराटच्या नेतृत्वात खेळायचे नाही, अशा चर्चांना उधाण आले. मात्र असे काही नसल्याचे विराटकडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. त्यामुळे इंडियन क्रिकेट टीममध्ये चाललंय काय? हे समजू शकलेलं नाही.

रोहितकडे वनडे, टी-20 संघाची कमान

विराट कोहलीने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआयने रोहित शर्माला टी-20 संघाचा कर्णधार बनवले. पूर्णवेळ कर्णधार म्हणून गतवर्षी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत रोहित शर्माच्या कर्णधारपदाची चुणूक पाहायला मिळाली. त्या मालिकेत भारताने 3-0 ने विजय मिळवला होता.

इतर बातम्या

Virat Kohli: विराटच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे ‘हे’ पाच प्रश्न निर्माण झाले, त्याची उत्तर कधी मिळणार?

Virat Kohli: आकडे खोटं बोलणार नाहीत! विराट भारताचाच नाही, कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला चौथा यशस्वी कॅप्टन

ViratKohli: Wisden इंडियाने खास टि्वट करुन विराटच्या कॅप्टनशिपला केला सलाम

(Rohit Sharma opens up on Virat Kohli’s decision to step down as Team India’s Test captain)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें