IPL 2023 : ‘Sunil Gavaskar तुमच्याशी बोलायला येणार नाहीत, तुम्हाला…’ वीरेंद्र सेहवागचा मोठा खुलासा

| Updated on: May 18, 2023 | 1:25 PM

IPL 2023 : सेहवागचा पृथ्वी शॉ आणि शुभमन गिलबद्दल धक्कादायक खुलासा. शुटिंगच्या सेटवर काय घडलेलं? त्यातून आजच्या पिढीचे स्टार क्रिकेटपटू शुभमन गिल, पृथ्वी शॉ यांचं वर्तन कसं आहे ते लक्षात येतं.

IPL 2023 : Sunil Gavaskar तुमच्याशी बोलायला येणार नाहीत, तुम्हाला... वीरेंद्र सेहवागचा मोठा खुलासा
Gavasjar-sehwag-shaw
Image Credit source: ANI
Follow us on

नवी दिल्ली : टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने नुकताच एक किस्सा सांगितला. त्यातून आजच्या पिढीचे स्टार क्रिकेटपटू शुभमन गिल, पृथ्वी शॉ यांचं वर्तन कसं आहे ते लक्षात येतं. पृथ्वी शॉ ने काल बऱ्याच दिवसानंतर पंजाब किंग्स विरुद्ध अर्धशतक झळकावल. फॉर्मसाठी त्याचा संघर्ष सुरु होता. पृथ्वी शॉ ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार सुरुवात केली होती. पण ती लय त्याला कायम राखता आली नाही. पृथ्वी शॉ आता मागे पडलाय.

पृथ्वी शो सलामीला येतो. या जागेसाठी आता त्याच्यासमोर शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल सारख्य खेळाडूंच आव्हान आहे. भारतीय क्रिकेटमधील भविष्यातील मोठा खेळाडू म्हणून पृथ्वी शॉ कडे पाहिलं जायचं. पण दिल्ली कॅपिटल्सने 26 दिवस त्याला बेंचवर बसवून ठेवलं. याचं कारण होतं, पृथ्वी शॉ चा खराब फॉर्म.

सेहवागने सांगितला किस्सा

पृथ्वी शॉ ने अखेर काल, चालू सीजनमधली पहिली हाफ सेंच्युरी झळकवली. त्याने पंजाब किंग्स विरुद्ध 38 चेंडूत 54 धावा फटकावल्या. वीरेंद्र सेहवागने पृथ्वी शॉ सोबतच्या भेटीचा एक किस्सा सांगितला. त्यावेळी त्याने 2003-04 मध्ये पहिल्यांदा सुनील गावस्करांना भेटलो, तो अनुभव सुद्धा सांगितला.

सेहवागने सांगितली मोलाची गोष्ट

“पृथ्वी शॉ सोबत मी एक जाहीरात शूट केलीय. शुभमन गिल सुद्धा त्यावेळी तिथे होता. तिथे ते एकदाही क्रिकेटबद्दल बोलले नाहीत. आम्ही तिघे तिथे 6 तास होतो. जर तुम्हाला कोणाशी बोलायच असेल, तर तुम्हाला त्याच्याशी संपर्क साधला पाहिजे. मी टीममध्ये नवीन होतो. तेव्हा मला सनी भाई म्हणजे सुनील गावस्करांबरोबर बोलायच होतं. मी जॉन राइट यांच्याशी बोललो, त्यांना सांगितलं, मी नवीन खेळाडू आहे. सुनील गावस्कर मला भेटतील की, नाही माहित नाही. पण तुम्ही एक बैठक आयोजित करा. 2003-04 साली जॉन राइट यांनी एक डिनर कार्यक्रम आयोजित केला. माझा ओपनर पार्ट्नर आकाश चोप्रा माझ्यासोबत येईल, जेणेकरुन आम्हाला बॅटिंगबद्दल बोलता येईल, असं मी राइट यांना सांगितलं. गावस्करांबरोबर आमचा डिनर कार्यक्रम झाला. तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. सुनील गावस्कर हे सेहवाग किंवा चोप्राशी बोलण्याचा प्रयत्न नाही करणार” अस सेहवाग क्रिकबझशी बोलताना म्हणाला.

…तर पृथ्वी शॉ ला नक्कीच मदत केली असती

“सुनील गावस्करांनी आम्हाला काही टिप्स दिल्या. आम्ही बराचवेळ बोलत होतो. तो संवाद आमच्यासाठी पुरस्कारासारखा होता. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. गावस्कर वीरेद्र सेहवाग किंवा आकाशा चोप्राशी बोलायला येणार नाहीत. तुम्हाला त्यासाठी विनंती करावी लागते. पृथ्वी शॉ ने अशी विनंती केली असती, तर नक्कीच कोणीतरी त्याला मदत केली असती”असं सेहवाग म्हणाला.

मानसिक दृष्टया तुम्ही फिटनेस हवा

“शॉ ला कोणाशी बोलायच असेल, तर तो दिल्ली टीमच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसरला तसं सांगू शकतो. क्रिकेटमध्ये तुम्ही कितीह टॅलेंटेड असला, तरी मानसिक दृष्टया तुम्ही फिट नसाल, तुमच मन ताजतवानं नसेल, तर काही होऊ शकत नाही” असं सेहवाग म्हणाला.