AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : Prithvi shaw ने हाफ सेंच्युरी झळकवताच नाशिकची मुलगी खुश, ‘ती’ खास पृथ्वीसाठी आलेली

Prithvi shaw IPL 2023 : टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ ची कथित गर्लफ्रेंड नाशिकची आहे. पृथ्वीला सपोर्ट करण्यासाठी ती मैदानात हजर होती. पृथ्वीने पंजाब विरुद्ध संधी मिळाल्यानंतर त्याचा पुरेपूर फायदा उचलत हाफ सेंच्युरी झळकवली.

IPL 2023 : Prithvi shaw ने हाफ सेंच्युरी झळकवताच नाशिकची मुलगी खुश, 'ती' खास पृथ्वीसाठी आलेली
Prithvi shaw ipl 2023Image Credit source: instagram
| Updated on: May 18, 2023 | 9:36 AM
Share

नवी दिल्ली : IPL 2023 च्या सीजनची सुरुवात पृथ्वी शॉ साठी अजिबात चांगली झाली नाही. टीम इंडियाच प्रतिनिधीत्व करणारा पृथ्वी शॉ़ सीजनच्या सुरुवातीला पूर्णपणे फ्लॉप होता. त्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधून ड्रॉप करण्यात आलं. पृथ्वीला दिल्ली कॅपिटल्सने पुन्हा एकदा पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात संधी दिली. धर्मशाळा येथे ही मॅच झाली. पृथ्वीने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला.

पृथ्वी शॉ ने पंजाब विरुद्ध आक्रमक बॅटिंग करत हाफ सेंच्युरी झळकवली. पुन्हा एकदा पृथ्वीने आपला क्लास दाखवून दिला. पृथ्वी शॉ ने पंजाब किंग्स विरुद्ध 38 चेंडूंचा सामना केला. त्याने 142.11 च्या स्ट्राइक रेटने 54 धावा केल्या.

प्रेक्षक स्टँडमधून खास सपोर्ट्

पृथ्वीच्या या आक्रमक खेळीत 7 चौकार आणि 1 सिक्स होता. त्याने दिल्लीला पंजाब विरुद्ध चांगली सुरुवात दिली. पृथ्वी शॉ ला या मॅचमध्ये प्रेक्षक स्टँडमधून खास सपोर्ट् मिळाला. पृथ्वीला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये निधी तापडिया उपस्थित होती. तिचं नाव पृथ्वी शॉ सोबत जोडलं जातं. शॉ ची जबरदस्त बॅटिंग पाहून निधीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेयर केली. पृथ्वीने सुद्धा ही स्टोरी स्वत:च्या स्टोरीमध्ये शेयर केलीय.

क्राइम शो सीआयडीमध्ये काम केलय

पृथ्वी शॉची कथित गर्लफ्रेंड निधी तापडिया महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आहे. पेशाने ती अभिनेत्री आणि मॉडेल आहे. सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात एक्टिव आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर 107K पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. निधीने कॉ़मर्समधून आपलं ग्रॅज्युएशन केलय. निधीने लोकप्रिय क्राइम शो सीआयडीमध्ये सुद्धा काम केलय. शॉ आणि निधीने अनेकदा परस्परांसोबत फोटो पोस्ट केलेत. आपल्या नात्याबद्दल पृथ्वी किंवा निधी दोघांनी अजूनपर्यंत काहीही जाहीर केलेलं नाहीय.

पृथ्वीने फोटो शेयर करुन केला डिलीट

वॅलेंटाइन्स डे च्या दिवशी पृथ्वी शॉ ने निधी सोबतचा फोटो शेयर करुन डिलीट केला होता. निधी पृथ्वीला सपोर्ट करण्यासाठी मैदानात हजर होती, हे सर्व दोघांमध्ये सिक्रेट रिलेशनशिप असल्याकडे इशार करतयय. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या एका हॉटेल बाहेर झालेल्या हाणामारीमुळे पृथ्वी शॉ चर्चेत आला होता. सपना गिल ही मॉडेल आणि तिच्या मित्रांसोबत पृथ्वीची वादावादी झाली होती. या भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पोलीस ठाण्यात दोन्ही बाजुंनी परस्पराविरोधात गुन्हे नोंदवण्य़ात आले. या सगळ्याचा पृथ्वीच्या खेळावर परिणाम झाला असं म्हटलं जातं.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.