IND vs PAK: सामना फिरवणारे कोहलीचे ते 2 शॉट्स, पहा VIDEO सचिन-रोहितकडून सलाम

IND vs PAK: कोहलीचा हा शॉट पाहून क्रिकेट जगत थक्क झालं, सामना इथेच भारताच्या बाजूने फिरला

IND vs PAK:  सामना फिरवणारे कोहलीचे ते 2 शॉट्स, पहा VIDEO सचिन-रोहितकडून सलाम
Virat Kohli
Image Credit source: AFP
| Updated on: Oct 24, 2022 | 7:39 AM

मेलबर्न: 10 वर्षापूर्वी कोलंबोत टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup) झाला. त्या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली पहिल्यांदा पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) खेळला होता. विराट कोहलीने (Virat Kohli) झुंजार अर्धशतक झळकावून टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. आता पुन्हा एकदा विराट कोहली अविश्वसनीय इनिंग खेळला. टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पाकिस्तान विरुद्ध दीर्घकाळ लक्षात राहील, असा विजय मिळवून दिला.

सामना भारताच्या बाजूने झुकला

एकवेळ टीम इंडियाचा विजय खूप कठीण वाटत होता. पण विराटने असे षटकार मारले, ज्यामुळे सामना भारताच्या बाजूने झुकला. या इनिंगसाठी सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मानेही विराटला सलाम केला.

टीम इंडियाची यावेळी सुद्धा खराब सुरुवात

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रविवारी 23 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना झाला. टीम इंडियाने पहिली गोलंदाजी केली. पाकिस्तानने 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 159 धावा केल्या. मागच्या वर्ल्ड कपप्रमाणे टीम इंडियाने यावेळी सुद्धा खराब सुरुवात केली.

यावेळी सुद्धा रोहित शर्मा, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात आऊट झाले. फक्त 31 धावात टीम इंडियाच्या 4 विकेट गेल्या होत्या. इथूनच विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने डाव सावरला व टीम इंडियाला एक संस्मरणीय विजय मिळवून दिला.

कोहलीच्या SIX ने क्रिकेट जगत थक्क

लास्टच्या दोन ओव्हर्समध्ये टीम इंडियाला विजयासाठी 31 धावांची गरज होती. 19 व्या ओव्हरमध्ये हॅरिस रौफ गोलंदाजी करत होता. त्याने 3 ओव्हर्समध्ये 21 धावा देऊन 2 विकेट काढल्या. ओव्हरच्या पहिल्या चार चेंडूंवर फक्त 3 धावा निघाल्या. भारतावर दबाव होता. पण त्यावेळी कोहली फॉर्ममध्ये होता. कोहलीने सलग दोन सिक्स मारले, ज्याने क्रिकेट जगत थक्क झालं.

चेंडू कोहलीच्या कमरेपेक्षा वर आला

रौफचा पाचवा चेंडू बॅक ऑफ द लेंथ होता. हा चेंडू कोहलीच्या कमरेपेक्षा पण जास्त उंचावर होता. पण कोहलीने संतुलन गमावल नाही. हा बॉल विराटने बॅकफूट पंचच्या अंदाजात लाँग ऑन बाऊंड्रीच्या पार पाठवून सिक्स मारला. कोहलीच्या या सिक्सने पाकिस्तानला बॅकफूटवर ढकललं.

मेलबर्न ग्राऊंडमधील 90 हजार प्रेक्षकांनी आनंदाने उड्या मारल्या. कोहलीने पुढच्या सहाव्या चेंडूवर फ्लिक करुन फाइन लेगला सिक्स मारला. या 19 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाने 15 धावा वसूल केल्या. त्यामुळे अखेरच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज होती.