AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप विजयाचा आणखी एक योग 43 वर्षांनी जुळून आला, झिम्बाब्वेचं जिंकणं टीम इंडियासाठी लकी!

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला दुबळ्या झिम्बाब्वेने धोबीपछाड दिला आहे. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी पराभूत करत स्पर्धेत मोठा उलटफेर केला. या विजयामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. त्याला कारणही तसंच आहे.

टी20 वर्ल्डकप विजयाचा आणखी एक योग 43 वर्षांनी जुळून आला, झिम्बाब्वेचं जिंकणं टीम इंडियासाठी लकी!
टी20 वर्ल्डकप विजयाचा आणखी एक योग 43 वर्षांनी जुळून आला, झिम्बाब्वेचं जिंकणं टीम इंडियासाठी लकी!Image Credit source: PTI
| Updated on: Feb 13, 2026 | 8:21 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत टीम इंडिया प्रबळ दावेदार आहे. त्याला कारण तसंच आहे. गेल्या काही वर्षात व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे सलग टी20 वर्ल्डकप जिंकण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. आता काही योग देखील जुळून आले आहेत. त्यामुळे टीम इंडियाचे चाहते खूश झाले आहेत. हे काही तज्ज्ञ किंवा भारतीय चाहत्यांचं मत नाही, तर तसा योगच दिसत आहे. याचं कारण ठरला आहे ते झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियावर मिळवलेला विजय.. झिम्बाब्वेने गट ब मध्ये ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी धोबीपछाड दिला आहे. त्यामुळे सुपर 8 फेरीचं ऑस्ट्रेलियाचं गणित चुकलं आहे. तर झिम्बाब्वे सुपर 8 फेरीत जागा मिळवेल अशी स्थिती आहे. या गटाशी टीम इंडियाचं काही देणं घेणं नाही. पण योग विजयाचं गणित जुळवून जात आहे.

क्रिकेट वर्ल्डकपच्या इतिहासात झिम्बाब्वेने तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आहे. जेव्हा झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं तेव्हा भारताने जेतेपदाची चव चाखली आहे. सर्वात पहिल्यांदा हा योग 1983 साली म्हणजेच 43 वर्षांपूर्वी जुळून आला होता. तेव्हा झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं आणि भारताचे पहिल्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर झिम्बाब्वेने 2007 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला मात दिली होती. तेव्हा भारताने जेतेपद मिळवलं होतं. आता 19 वर्षानंतर झिम्बाब्वेने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पराभूत केलं आहे. त्यामुळे यंदाही भारत जेतेपद मिळवेल असं भाकीत काही क्रीडाप्रेमी वर्तवत आहेत.

खरं तर योग वगैरे जेतेपदाचं गणित काही सोडवत नाही. पण त्याची चर्चा होत असते. जेतेपदासाठी चांगल्या कामगिरीची गरज असते. मग योग जुळून यावा की नाही यावर काही ठरत नाही. भारताने या स्पर्धेत जबरदस्त सुरूवात केली आहे. पहिल्या सामन्यात अमेरिकेला, दुसऱ्या सामन्या नामिबियाला पराभूत केलं आहे. आता भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यात विजय मिळवला तर सुपर 8 फेरीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यानंतर सुपर 8 फेरीत तगडे संघ असून खरा कस लागणार आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात