AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो विचित्र जीव… जो मेल्यावरही पुन्हा पुन्हा होतो जीवंत, कसे मिळाले त्याला अमरत्व?

Strange Creature in North America: उत्तर अमेरिकेतली दाट आणि बर्फाळ भागात एक विचित्र जीव आढळतो. त्याच्या मृत्यूचे रहस्य हे शास्त्रज्ञांसाठी मोठे रहस्य आहे. त्यामागील कारणही तितकेच गूढ आहे. हा जीव पुन्हा पुन्हा जीवंत होत असल्याचा वैज्ञानिकांचा दावा आहे.

तो विचित्र जीव... जो मेल्यावरही पुन्हा पुन्हा होतो जीवंत, कसे मिळाले त्याला अमरत्व?
| Updated on: Jul 03, 2026 | 3:47 PM
Share

Wood Frog in North America: वुड फ्रॉग (Wood Frog) हा उत्तर अमेरिकेच्या घनदाट आणि बर्फाळ जंगलात आढळणारा एक छोटा रहस्यमयी जीव आहे. त्याचे शास्त्रीय नाव Rana sylvatica असे आहे. दिसायला हा साधा बेडूक आहे. पण त्याची जीवनशैली एखाद्या चमत्काराशिवाय कमी नाही. कडाक्याची थंडी आणि बर्फाच्छादित वातावरणातही हा जीव त्याची अद्भूत क्षमता टिकवून आहे. जीवनाचे हे वैशिष्ट्ये इतर कोणत्याही जीवात दिसत नाही. या भागात हिवाळ्यात तापमान उणे शून्यापेक्षा ही कमी होते. त्याचे संपूर्ण शरीर गारठून बर्फाचा गोळा होते. पण हा बेडूक मरत नाही. तो निद्रिस्त अवस्थेत असतो. त्याचे हृदय आणि श्वास मंदावतो. तरीही हा बेडूक जीवंत असतो. हवामान बदलानंतर उन्हाळा आल्यावर तो पुन्हा नव्या जोमाने आणि दमाने त्याचे खाद्य शोधायला बाहेर पडतो. त्याची ही जीवनगाथा जंगलातील प्राणी जीवनातील एक अद्भूत मानली जाते.

हिवाळा येताच फ्रीज मोड

जेव्हा तापमान उणे होते. तेव्हा बेडूक जमिनीवरील झाडांचे पत्ते आणि माती कोरून दडतो. त्याचे शरीर हळूहळू बर्फात रुपांतरीत होते. या कमालीच्या गोठावणाऱ्या थंडीत तो अनेक आठवडे निद्रिस्त अवस्थेत जातो. यावेळी त्याचा श्वास आणि हृदयाचे ठोके जणू बंद होतात. कोणताही हालचाल न करता तो निपचित पडलेला असतो.

निसर्गाची दैवी देणगी

जसी थंडी वाढते. तेव्हा याचे यकृत ग्लुकोज तयार करायला सुरूवात करते. काही वेळा ग्लिसरॉल तयार करते. हे घटक एकत्रितपणे एका कमाल मर्यादेत शरीराला गोठण्यापासून थांबवतात. त्याच्या धमण्या आणि रक्तवाहिन्या गोठून फाटत नाहीत अथवा त्यांना इजा होत नाही. त्या उलट सुरक्षित राहतात. या जीवाने निसर्गाशी सूर जुळवून घेतल्याचे दिसते.

हृदय, श्वास आणि मेंदूसुद्धा होतो बंद

हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल. अथवा त्यात काहीच तथ्य जाणवणार नाही. गोठलेल्या कमाल थंडीत वुड फ्रॉगचे हृदय, श्वास आणि मेंदूसुद्धा काम करणे थांबवतो. बाहेरून हा बेडूक मृत अवस्थेत असल्याचे भासते. पण या विपरीत परिस्थितीतही हा बेडूक जिवंत असतो. हा निसर्गाचा चमत्कार आहे.

65-70 टक्के शरीर गोठते

याचे शरीर हे बर्फाने गोठते. संपूर्ण शरीरावर बर्फाचा थर जमा होतो. पण त्याच्या धमण्या आणि रक्तवाहिन्यांतून शरीराला ऊर्जा देणारी शक्ती प्रवाहित असते. नस, धमण्या गोठत नाहीत, त्या सुरक्षित असतात. त्यामुळे उन्हाळा आल्यावर बर्फ वितळला की हा बेडूक पुन्हा सक्रिय होतो. त्याचा दिनक्रम सुरू होतो.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा