Cricket: 6 जुलैला टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने, हे दिग्गज भिडणार

World Championship of Legends 2024: आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर आता क्रिकेट चाहत्यांना पुढील काही दिवस आपल्या आवडत्या खेळाडूंना मैदानात खेळताना पाहायला मिळणार आहे.

Cricket: 6 जुलैला टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने, हे दिग्गज भिडणार
ind vs pak flag cricket
| Updated on: Jul 03, 2024 | 5:14 PM

टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट टीमचा पराभव केला. त्यानंतर आता हायव्होल्टेज सामना होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. मात्र या सामन्यात माजी खेळाडू असणार आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेंड्स 2024 स्पर्धेला 3 जुलैपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी असणार आहेत. या स्पर्धेत 6 संघात माजी खेळाडू खेळणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा आपल्या आवडत्या खेळाडूंना पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळणार आहे.

प्रत्येक संघ या स्पर्धेत एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहे. त्यानुसार टीम इंडिया पाकिस्तान हा सामना 6 जुलै रोजी होणार आहे. हा स्पर्धेतील सर्व सामने हे बर्मिंगघम आणि नॉर्थम्टन येथे आयोजित करण्यात आले आहेत. या स्पर्धेत टीम इंडियाच्या माजी दिग्गजांच्या संघाचं नाव हे इंडिया चॅम्पियन्स असं आहे. तर पाकिस्तानच्या टीमचं नाव पाकिस्तान चॅम्पियन्स असं आहे. युनूस खान पाकिस्तान चॅम्पियन्स टीमचं नेतृत्व करणार आहे. युनूस खान याच्या नेतृत्वात पाकिस्तान क्रिकेट टीमने 2009 साली टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली होती. तर युवराज सिंह याच्याकडे इंडिया चॅम्पियन्सची सूत्र आहेत. टीम इंडियाने 2007 साली वर्ल्ड कप जिंकला होता. युवराज सिंह त्या टीमचा सदस्य होता.

इंडिया चॅम्पियन्सच्या सामन्यांचं वेळापत्रक

विरुद्ध इंग्लंड, 3 जुलै

विरुद्ध पाकिस्तान, 6 जुलै

विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 8 जुलै

विरुद्ध दक्षिण आफ्रिका,10 जुलै

कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा आमनेसामने

पाकिस्तान चॅम्पियन्स : यूनुस खान (कॅप्टन), मिस्बाह उल हक, शाहिद अफ्रिदी, कामरान अकमल, अब्दुल रझ्झाक, वाहेब रियाझ, सईद अजमल, सोहेल तन्वीर, सोहेल खान, तन्वीर अहमद, मुहम्मद हफीझ , आमीर खान, शोएब मलिक, शोएब मकसूद, शार्जिल खान आणि उमर खान

इंडिया चॅम्पियन्स टीम: युवराज सिंह (कॅप्टन), हरभजन सिंह, सुरेश रैना, इरफान पठान, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, यूसुफ पठान, गुरकीरत मान, राहुल शर्मा, नमन ओझा, राहुल शुक्ला, आरपी सिंह, विनय कुमार, धवल कुलकर्णी, अनुरीत सिंह आणि पवन नेगी.