Nicholas Pooran ची कर्णधारपदी निवड, मुंबई इंडियन्स फ्रँचायजीचा मोठा निर्णय

Mumbai Indians franchise Nicholas Pooran Captain : वेस्ट इंडिजचा विकेटकीपर बॅट्समन निकोलस पूरन याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर मोठी जबाबदारी मिळाली आहे. मुंबई इंडियन्स फ्रँचायजीने पूरनला कॅप्टन केलं आहे.

Nicholas Pooran ची कर्णधारपदी निवड, मुंबई इंडियन्स फ्रँचायजीचा मोठा निर्णय
Mumbai Indians franchise Nicholas Pooran Captain
Image Credit source: Mumbai Indians Website
| Updated on: Jun 11, 2025 | 12:32 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमाची 3 जून रोजी सांगता झाली. या 18 व्या मोसमाच्या 7 दिवसांनंतर लखनौ सुपर जायंट्ससाठी खेळणाऱ्या वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरन याने मोठा निर्णय घेत क्रिकेट चाहत्यांना झटका दिला. पूरनने वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. पूरनच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर अवघ्या काही तासांनी या खेळाडूला मोठी लॉटरी लागली आहे. पूरनला मुंबई इंडियन्स फ्रँचायजीने मोठी जबाबदारी दिली आहे. मुंबई इंडियन्स 18 व्या मोसमात सहाव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरली. मुंबईला क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं. त्यानंतर आता फ्रँचायजीने दुसऱ्या लीग स्पर्धेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. निकोलस पूरन याची न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या मेजर लीग क्रिकेट (MLC) स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मेजर लीग क्रिकेट स्पर्धेतील गेल्या हंगामात किरॉन पोलार्ड याच्याकडे मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क संघाचं नेतृत्व होतं. पोलार्डच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क टीमने ट्रॉफी जिंकली होती. तर यंदा आगामी हंगामासाठी पोलार्डच्या जागी निकोलस पूरन याची नियुक्ती करण्यात आली आहे.

पूरनची आयपीएल 2025 मधील कामगिरी

निकोलस पूरन याने आयपीएल 2025 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. पूरनला लखनौ सुपर जायंट्सने हंगामाआधी 21 कोटी रुपये मोजून रिटेन केलं होतं. त्यानंतर निकोलसनही पैसावसूल कामगिरी केली. निकोलसने 14 सामन्यांमध्ये 524 धावा केल्या. निकोलसने 196.25 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. पूरनने या दरम्यान 5 अर्धशतकं झळकावली. पूरनच्या या खेळीत 40 षटकारांचा समावेश होता. पूरन या हंगामात सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाजही ठरला.

आयपीएल कारकीर्द

निकोलसने आयपीएलमध्ये एकूण 90 सामने खेळले आहेत. पूरनने या 90 सामन्यांमधील 87 डावांमध्ये 34.22 च्या सरासरीने आणि 168.98 च्या स्ट्राईक रेटने 2 हजार 293 धावा केल्या आहेत. तसेच पूरनने या दरम्यान 14 अर्धशतक झळकावली आहेत. तसेच पूरनने आयपीएल कारकीर्दीत 167 षटकार आणि 157 चौकार लगावले आहेत.

निकोलस पूरनला कर्णधारपादाची जबाबदारी

निकोलस पूरन याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

निकोलस पूरन याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 9 वर्षांची राहिली. पूरनने या 9 वर्षांच्या कारकीर्दीत विंडीजचं 61 एकदिवसीय आणि 106 टी 20I सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. पूरनने वनडेत 3 शतकं आणि 11 अर्धशतकांसह 1 हजार 983 धावा केल्या. तर पूरनने टी 20I कारकीर्दीत 2 हजार 275 धावा केल्या. पूरनने या छोट्या फॉर्मेटमध्ये 13 अर्धशतकं झळाकवली.