AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket Retirement : 29 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, रोहित-विराटनंतर विकेटकीपर बॅट्समनचा चाहत्यांना झटका

International Cricket : क्रिकेट वर्तुळात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक दिग्गजांनी निवृत्ती जाहीर केली आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, अँजलो मॅथ्यूज, पीयूष चावला या आणि अन्य दिग्गजांचा समावेश आहे.

Cricket Retirement : 29 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, रोहित-विराटनंतर विकेटकीपर बॅट्समनचा चाहत्यांना झटका
IND vs WI CricketImage Credit source: AP
Follow us
| Updated on: Jun 10, 2025 | 8:02 AM

क्रिकेट विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. विस्फोटक विकेटकीपर फलंदाजाने वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी एका झटक्यातच कसोटी, वनडे आणि टी 20i अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. क्रिकेट कारकीर्द ऐन रंगात असताना या क्रिकेटरने असा निर्णय का घेतला? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे तडकाफडकी कसोटी क्रिकेटला अलविदा केला होता. त्यामुळे भारतीय चाहत्यांनाही झटका लागला होता. आता हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणारा खेळाडू कोण? हे जाणून घेऊयात.

वेस्टइंडिजचा युवा विकेटकीपर फलंदाज निकोलस पूरन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. विंडीज क्रिकेट टीमकडून सोशल मीडियावरुन प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. तसेच निकोलस पूरन याने स्वत: इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट करत या निर्णयाची माहिती क्रिकेट चाहत्यांना दिली आहे.

निकोलस पूरन याची पोस्ट

“मी फार विचार केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या खेळावर आपण प्रेम करतो, त्याने आपल्याला खूप काही दिलंय आणि देत राहिल. या खेळाने आनंद, अनेक आठवणी आणि वेस्ट इंडीजचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. मरुन रंगाची जर्सी परिधान करुन राष्ट्रगीतासाठी उभं राहणं आणि मैदानात पाय ठेवता आपलं सर्वस्व देणं…. शब्दात व्यक्त होणं अवघड आहे की क्रिकेट माझ्यासाठी वास्तवात किती महत्त्वपूर्ण आहे”, असं म्हणत पूरनने त्याच्या आयुष्यातील क्रिकेटचं महत्त्वं नमूद केलं.

“कर्णधार म्हणून संघाचं नेतृत्व करणं हा एक सन्मान आहे. हा सन्मान कायम माझ्या मनात राहिल. चाहत्यांचं अतूट प्रेमासाठी आभार. मला तुम्ही कठीण काळात साथ दिली आणि चांगले क्षण अतुलनीय उत्साहाने साजरे केले. माझ्यासोबत या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल माझे कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांचे आभार. तुमचा विश्वास आणि पाठिंब्याने मला या सर्व परिस्थितीतून पुढे जाण्यास मदत झाली”, असं म्हणत निकोलसने कुटुंबिय, सहकारी, मित्र आणि चाहत्यांचे आभार व्यक्त केले.

निकोलसचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

निकोलस पूरनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

निकोलसने विंडीजचं टी 20i आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. तर त्याला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचं भाग्य लाभलं नाही. निकोलसने 23 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तान विरुद्ध टी 20i क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. तर निकोलसचा बांग्लादेश विरुद्ध 19 डिसेंबर 2024 रोजीचा बांगलादेश विरुद्धचा सामना हा त्याच्या कारकीर्दीतील शेवटचा सामना ठरला. निकोलसने 106 टी 20i सामन्यांमध्ये 135.40 च्या स्ट्राईक रेटने आणि 26.15 च्या सरासरीने 2 हजार 275 रन्स केल्या. निकोलसने या दरम्यान एकूण 13 अर्धशतकं झळकावली.

तसेच निकोलस विंडीजसाठी 61 एकदिवसीय सामने खेळला. निकोलसने या 61 सामन्यांमध्ये 99.15 च्या स्ट्राईक रेटने 1 हजार 983 धावा केल्या. निकोलसने या दरम्यान 3 शतकं आणि 11 अर्धशतकं झळाकावली.

उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्यात घमासान, अ‍ॅम्ब्युलन्स, मुडदा अन्...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्यात घमासान, अ‍ॅम्ब्युलन्स, मुडदा अन्....
मनसे युतीबाबत ठाकरे सकारत्मक, जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत दिला एकच आदेश
मनसे युतीबाबत ठाकरे सकारत्मक, जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत दिला एकच आदेश.
हिंदी बोलेंगे, पढेंगे कोई रोक सके तो..,सदावर्तेंचं राज ठाकरेंना चॅलेंज
हिंदी बोलेंगे, पढेंगे कोई रोक सके तो..,सदावर्तेंचं राज ठाकरेंना चॅलेंज.
एअर इंडियाच्या पक्षी धडकला अन्... आणखी एक दुर्घटना टळली, बघा काय घडलं?
एअर इंडियाच्या पक्षी धडकला अन्... आणखी एक दुर्घटना टळली, बघा काय घडलं?.
फडणवीसांच्या कार्यक्रमात खडसे; म्हणाले, ते आले पण पदरात काहीच पडल नाही
फडणवीसांच्या कार्यक्रमात खडसे; म्हणाले, ते आले पण पदरात काहीच पडल नाही.
स्मशानभूमीत नग्न दाम्पत्याकडून अघोरी पूजा, CCTVमध्ये जे दिसलं त्यानं..
स्मशानभूमीत नग्न दाम्पत्याकडून अघोरी पूजा, CCTVमध्ये जे दिसलं त्यानं...
पुणेकरांनो शहरातील हे 20 रस्ते 23 जूनपर्यंत वाहतुकीसाठी बंद, कारण काय?
पुणेकरांनो शहरातील हे 20 रस्ते 23 जूनपर्यंत वाहतुकीसाठी बंद, कारण काय?.
झिंज्या उपटल्या, रक्तबंबाळ होईपर्यंत हाणामारी.. लोकलमधला VIDEO व्हायरल
झिंज्या उपटल्या, रक्तबंबाळ होईपर्यंत हाणामारी.. लोकलमधला VIDEO व्हायरल.
फडणवीस मंचावर, खडसेंना स्थान नाही? नाव घेणंही टाळलं; जळगावात काय घडलं?
फडणवीस मंचावर, खडसेंना स्थान नाही? नाव घेणंही टाळलं; जळगावात काय घडलं?.
मुसळधार पावसानं विजेचा DP कोसळला अन्...बघा VIDEO तुम्हालाही भरेल धडकी
मुसळधार पावसानं विजेचा DP कोसळला अन्...बघा VIDEO तुम्हालाही भरेल धडकी.