AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी तुझ्यासाठी बोली लावणार.. संजीव गोयंका यांचं वैभव सूर्यवंशीसोबत बोलणं, गावसकर यांनी केलं उघड!

आयपीएल 2026 स्पर्धेच्या प्लेऑफचा थरार अजून संपलेला नाही. एक स्थान शिल्लक असून पाच संघात चुरस आहे. असं असताना राजस्थान रॉयलन्सने लखनौला पराभूत करत आशा जिवंत ठेवल्या आहेत. या सामन्यात वैभव सूर्यवंशीचा झंझावात पाहायला मिळाला.

मी तुझ्यासाठी बोली लावणार.. संजीव गोयंका यांचं वैभव सूर्यवंशीसोबत बोलणं, गावसकर यांनी केलं उघड!
मी तुझ्यासाठी बोली लावणार.. संजीव गोयंका यांचं वैभव सूर्यवंशीसोबत बोलणं, गावसकर यांनी केलं उघड!Image Credit source: X
| Updated on: May 20, 2026 | 4:10 PM
Share

Sanjiv Goenka- Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएलच्या या पर्वात कमाल केली आहे. त्याच्या आक्रमक खेळीमुळे राजस्थान रॉयल्सला फायदा झाला आहे. प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या सामन्यात त्याची बॅट पुन्हा एकदा तळपली. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना जिंकण खूपच महत्वाचं होतं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून राजस्थानने प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. विजयासाठी 220 धावांचं मजबूत लक्ष्य ठेवलं होतं. पण राजस्थान रॉयल्सने हे लक्ष्य 3 गडी गमवून 19.1 षटकात पूर्ण केलं. या विजयाचा शिल्पकार ठरला तो वैभव सूर्यवंशी… त्याने 38 चेंडूत 10 षटकार आणि 7 चौकार मारत 93 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे राजस्थान रॉयल्सचा विजय सोपा झाला. त्याला या खेळीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्यानंतर संजीव गोयंका आणि त्यांची पत्नी वैभव सूर्यवंशीला भेटण्यासाठी गेले आणि चर्चा केली.

वैभव सूर्यवंशीची भेट घेण्यासाठी गेलेल्या संजीव गोयंका यांना पाहून समालोचक सुनील गावस्कर यांनी मिश्किल टिपणी केली आहे. सामन्यानंतर संजीव गोयंका पराभूत झालेल्या आपल्या संघाशी चर्चा करण्याऐवजी वैभव सूर्यवंशीकडे गेले. यावेळी त्यांची पत्नीही सोबत होती. वैभवने त्या दोघांना पाहताच खाली वाकून पाया पडला.

वैभव-गोयंका यांच्या भेटीवर गावसकर काय म्हणाले?

संजीव गोयंका यांनी वैभव सूर्यवंशीसोबत संवाद साधला. या दोघांची चर्चा पाहून समालोचक सुनील गावसकर मजेशीर अंदाजात भाष्य केलं. सुनील गावसकर म्हणाले की, संजीव गोयंका वैभवला सांगत आहेत की पुढच्या वर्षी मी तुझ्यासाठी बोली लावणार.

वैभवने गोयंका परिवारातील मुलांना ऑटोग्राफ दिला

वैभव सूर्यवंशीने संजीव गोयंका आणि त्यांच्या पत्नीसोबत चर्चा केली आणि त्यांच्या कुटुंबियातील मुलांना ऑटोग्राफही दिला. वैभव सूर्यवंशी ऑटोग्राफ देत असलेला फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करत 2 गुण कमावले आहे. या दोन गुणांसह खात्यात 14 गुण आहेत. राजस्थान रॉयल्सने 13 सामन्यात 7 विजय मिळवले आहेत. आता शेवटचा सामना शिल्लक असून जिंकल्यास प्लेऑफमधील स्थान पक्कं होईल. राजस्थान रॉयल्सचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्ससोबत होणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...