AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीतील नेमकी अडचण काय? इरफान पठाणने सांगितलं काय चुकतंय?

आयपीएल 2026 स्पर्धेत अर्शदीप सिंग पंजाब किंग्सकडून खेळण्यास सज्ज झाला आहे. टी20 क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रभावी गोलंदाज ठरला आहे. पण त्याच्या गोलंदाजीतील एक उणीव इरफान पठाणने शोधून काढली आहे.

IPL 2026: अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीतील नेमकी अडचण काय? इरफान पठाणने सांगितलं काय चुकतंय?
IPL 2026: अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीतील नेमकी अडचण काय? इरफान पठाणने सांगितलं काय चुकतंय?Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 25, 2026 | 10:20 PM
Share

अर्शदीप सिंग टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला आहे. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याचा मान त्याला मिळाला होता. तसेच यंदाच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याने 8 सामन्यात 9 विकेट काढल्या. पण त्याची गोलंदाजी तितकी प्रभावी ठरली नाही. त्याने जवळपास साडे आठच्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या. त्यामुळे त्याचं काही चुकतंय का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. या दोन वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान त्याच्या गोलंदाजीत बदल दिसून आला आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणच्या मते, अर्शदीप सिंग नव्या चेंडूने स्विंग करणं विसरला आहे. आशिया कप स्पर्धेच्या पहिला आणि नंतरची तुलनेत नव्या चेंडूने गोलंदाजी करताना त्याच्या आकडेवारीत थोडी उतरण लागल्याचं दिसत आहे. त्याला या गोष्टीवर लक्ष ठेवावं लागेल. तसेच त्याला इकोनॉमी रेटही लक्ष केंद्रीत करावं लागेल.

इरफान पठाणने त्याच्या युट्यूब चॅनेलवर अर्शदीप सिंगबाबात सांगितलं की, ‘अर्शदीप सिंग तू सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. तो सलग विकेट घेत आहे. पण एक गोष्ट अशी आहे की त्यात त्याला लक्ष घालणं गरजेचं आहे. तो नव्या चेंडूने कशी गोलंदाजी करतो, हे पाहावं लागेल. मागच्या एका वर्षात किंवा त्यापेक्षा कमी वेळेत मी जे काही निरीक्षण केलं, त्यात तो नव्या चेंडूने जास्त इनस्विंग गोलंदाजी करत नाही.’ इरफान पठाणने आयपीएल स्पर्धेपूर्वी त्याला त्याची चूक निदर्शनास आणून दिली आहे. यावर आता अर्शदीप कसं काम करतो हे सामन्यातील कामगिरीवर दिसून येईल.

इरफान पठाणने निवडला पंजाबचा संघ

इरफान पठाणने अर्शदीप सिंगची पडकी बाजू सांगताना पंजाब किंग्सचा संघही निवडला आहे. इरफान पठाणने प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंगला ओपनर म्हणून निवडलं आहे. तर श्रेयस अय्यरला तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर पाठवलं पाहिजे असं मत व्यक्त केलं. त्यानंतर नेहल वढेरा, मार्क्स स्टोयनिस आणि शशांक सिंहला पसंती दिली आहे. फिरकीसाठी हरप्रीत ब्रार, तर वेगवान गोलंदाज म्हणून मार्को यानसेन, अर्शदीप सिंग आणि बेन डवारशुईस/लॉकी फर्ग्युसनला पसंती दिली आहे. तर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून युझवेंद्र चहलची निवड केली आहे.

Follow Us
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा