AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satta Sammelan 2026: गौतम गंभीर की गर्लफ्रेंड! अर्शदीपला कोणाची वाटते सर्वाधिक भीती? म्हणाला..

अर्शदीप सिंगने टीव्ही 9 नेटवर्कच्या सत्ता संमेलन कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्याचा दिलखुलास अंदाज प्रेक्षक आणि चाहत्यांना पाहायला मिळाला. यावेळी त्याने सर्व प्रश्नांनी उत्तर दिली. गौतम गंभीर की गर्लफ्रेंड कोणाची भीती वाटते याचं उत्तरही दिलं.

Satta Sammelan 2026: गौतम गंभीर की गर्लफ्रेंड! अर्शदीपला कोणाची वाटते सर्वाधिक भीती? म्हणाला..
Satta Sammelan 2026: गौतम गंभीर की गर्लफ्रेंड! अर्शदीपला कोणाची वाटते सर्वाधिक भीती? म्हणाला..Image Credit source: TV9 Network
| Updated on: Mar 24, 2026 | 4:39 PM
Share

Arshdeep Singh, Satta Sammelan: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टीव्ही 9 नेटवर्कच्या सत्ता संमेलन कार्यक्रमात उपस्थिती लावली. अर्शदीप सिंगवर यावेळी प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. पण त्याने न डगमगता सर्व प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली. त्याला लग्न कधी करणार असाही प्रश्न विचारला गेला. इतकंच काय तर, गौतम गंभीर की गर्लफ्रेंड यापैकी सर्वाधिक भीती कोणाची वाटते? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं त्याने दिली. यावेळी त्याच्यासोबत व्यासपीठावर संघ सहकारी अक्षर पटेलही होता. अर्शदीप सिंगने यावेळी भुताचे चित्रपट पाहतानाचा अनुभवही शेअर केला. सत्ता संमेलन कार्यक्रमात सांगितलं की, जेव्हा तुम्ही भुताचे चित्रपट पाहता तेव्हा तुम्ही एकटे नसता, तुमच्यासोबत 2-3 लोकं आणखी असतात. ज्यांना तुम्ही पाहू शकत नाही.

अर्शदीप सिंगला सर्वाधिक भीती कोणाची?

अर्शदीप सिंगला सत्ता संमेलन कार्यक्रात सर्वाधिक भीती कोणाची वाटते असा प्रश्न विचारला गेला. तसेच दोन पर्यायही दिले गेले. गौतम गंभीर आणि गर्लफ्रेंड असे दोन पर्याय दिले गेले होते. या प्रश्नाचं उत्तर अर्शदीप काय देईल याची उत्सुकता होती. पण त्याने या दोन्ही पर्यायांना बगल दिली. अर्शदीप सिंगने सांगितलं की, मला फक्त देवाची भीती वाटते, मी सर्वात जास्त त्यांनाच घाबरतो. अर्शदीपने या प्रश्नाचं एकदम स्मार्ट उत्तर दिलं. बऱ्याच लोकांना गौतम गंभीर किंवा गर्लफ्रेंड असं नाव घेईल असं वाटलं होतं. पण त्याने देवाचं नाव घेत, हा प्रश्न देवाकडे नेऊन ठेवला.

अर्शदीप सिंगला या कार्यक्रमात लग्नाबाबतही प्रश्न विचारण्यात आला. अर्शदीप सिंग कधी लग्न करणार असं विचारलं गेलं. तेव्हा त्याने सांगितलं की, 3-4 वर्षे तरी लग्न करणार नाही. इतकंच काय तर वडिलांना याबाबत स्पष्ट काय ते सांगितलं आहे. मी वडिलांना सांगितलं की, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर हसू दिसावं असं वाटत असेल तर लग्नाच्या गोष्टी करू नका. दुसरीकडे, अर्शदीप सिंगने मोबाईल पाहण्याच्या सवयीबाबतही सांगितलं. अर्शदीप सिंगने सांगितलं की, अक्षर भाई मला मोबाईल पाहण्यापासून रोखतो. हाच धागा पकडून अर्शदीप सिंगने लहान मुलांना सल्लाही दिला. मोबाईलपासून दूर राहा असं त्याने सांगितलं.

Follow Us
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल