AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baramati Plane Crash : मोठी बातमी! बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं, मदतीसाठी धावाधाव

बारामतीl पुन्हा एकदा विमान दुर्घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

Baramati Plane Crash : मोठी बातमी! बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं, मदतीसाठी धावाधाव
| Updated on: Aug 09, 2026 | 1:46 PM
Share

पुण्याच्या बारामतीतून मोठी बातमी हाती आली आहे. पुण्यातील बारामती विमानतळावर पुन्हा एकदा दुर्घटना घडली आहे. बारामतीमधील विमानतळ परिसरात एक शिकाऊ विमान कोसळल्याची माहिती आली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हे विमान नेमके कशामुळे कोसळले. तसेच या घटनेत पायलट किंवा अन्य व्यक्ती जखमी झाली आहे का, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. दुर्घटनेनंतर संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. बारामती विमानतळावर यापूर्वीही विमान दुर्घटनांच्या घटना घडल्या आहेत.  या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

पुण्याच्या बारामतीमध्ये मागील आठ महिन्यात तिसऱ्यांदा विमान अपघाताची घटना घडली आहे. या वर्षीच्या जानेवारी महिन्यात व्हीएसआर व्हेंचर्सचे लीयरजेटचे चार्टर विमान कोसळले होते. या विमान अपघातात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित 5 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात अजित पवारांच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर हवाई प्रवासावर प्रश्नचिन्ह करण्यात आले. त्यानंतर पुढे मे महिन्यात पुन्हा विमानाचा अपघात झाला होता. बारामतीच्या गोजुबावी गावाच्या हद्दीत दुसरा विमान अपघात झाला होता. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. शिकाऊ विमान हे इमर्जन्सी लँडिग करताना शेतात कोसळलं होतं. या दोन घटनानंतर आता तिसरा विमान अपघात घडला आहे. बारामती विमानतळावर शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडली.

विमान दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही 

बारामती विमानतळावर आज रविवारी दुपारच्या सुमारास विमान दुर्घटनेची घडली. विमानतळ परिसरात शिकाऊ विमान कोसळून ही दुर्घटना घडली. या विमान दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती हाती आली आहे. हे शिकाऊ विमान नेमकं कशामुळे कोसळलं, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या अपघातानंतर संबंधित तातडीने वेगाने तपासाला सुरुवात केली आहे. या अपघाताच्या कारणांचा तपासही यंत्रणांनी सुरू केला आहे. बारामती विमानतळावर याआधी दुर्घटना घडल्या आहेत. वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे विमानाने प्रवास करणाऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा