AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satta Sammelan 2026: अक्षर पटेलला त्याची पत्नी घरी येऊ देणार नाही? अर्शदीप असं का म्हणाला…

टीव्ही 9 नेटवर्कच्या सत्ता संमेलन व्यासपीठावर टीम इंडियाचे स्टार खेळाडू अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी हजेरी लावली. यावेळी दोघांनी दिलखुलासपणे गप्पांचा फड रंगवला. या दोघांनी मजेशीर किस्से सांगताना जबरदस्त टायमिंग साधलं.

Satta Sammelan 2026: अक्षर पटेलला त्याची पत्नी घरी येऊ देणार नाही? अर्शदीप असं का म्हणाला...
Satta Sammelan 2026: अक्षर पटेलला त्याची पत्नी घरी येऊ देणार नाही? अर्शदीप असं का म्हणाला...Image Credit source: TV9 Network
| Updated on: Mar 24, 2026 | 4:00 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली. सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवलं. या संघात अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल हे महत्त्वाचे शिलेदार होते. या दोघांनी टीव्ही 9 नेटवर्कच्या सत्ता संमेलन कार्यक्रमात हजेरी लावली. या दोघांनी या व्यासपीठावरून न ऐकलेले अनेक किस्से शेअर केले. त्यामुळे उपस्थितांमध्ये एक हशा पिकला. या कार्यक्रमात अक्षर पटेलला एक प्रश्न विचारला गेला. हा प्रश्न अक्षरची पत्नी मेहा पटेलला अनुसरून होता. हा प्रश्न विचारताच अर्शदीप सिंगने अक्षर पटेलची फिरकी घेतली. प्रश्न असा होता की, अक्षर तुझी पत्नी डायटिशियन आहे, त्याचा त्याला फायदा होतो की नुकसान? त्यावर अक्षर पटेलने उत्तर देण्याआधीच अर्शदीप सिंगने एक पुडी सोडली. त्यामुळे उपस्थितांना हसण्याशिवाय पर्यायच उरला नाही.

अक्षर पटेलने सांगितलं की, ‘जर पत्नी डायटिशियन असेल तर फायदाच होता. पत्नी जवळपास असेल तर नुकसान होण्याचा प्रश्नच उरत नाही.’ या प्रश्नाचं उत्तर देत असताना अर्शदीप सिंगने मध्येच उडी घेतली आणि म्हणाला की, ‘नुकसान बोलला तर त्याची घरात एन्ट्री बंद होईल.’ अर्शदीप सिंगने असं बोलताच उपस्थित प्रेक्षकवर्गाला हसण्याशिवाय पर्यायच नव्हता. अक्षर पटेलने पुढे सांगितलं की, माझी पत्नी डायटिशियन असली तरी जेव्हा मी लांबच्या टूरवरून घरी येतो तेव्हा ती स्वत: बाहेर जेवण्यासाठी घेऊन जाते.

टी20 वर्ल्डकप जेतेपदाचे हिरो

अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग या दोघांनी टी20 वर्ल्डकप जेतेपदात मोलाचं योगदान दिलं आहे. त्यामुळे टीम इंडियाला जेतेपद मिळवणं सोपं झालं. अक्षर पटेलने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 7 सामन्यात 11 विकेट घेतल्या. या विकेट मोक्याच्या क्षणी घेतल्याने सामन्याचं चित्र पालटलं. तर अर्शदीप सिंगने 9* विकेट घेतल्या. विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू टी20 वर्ल्डकप 2024 विजेत्या संघातही होते. आयपीएल स्पर्धेत अर्शदीप सिंग पंजाब किंग्स, तर अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. या दोन्ही संघांनी अजूनही जेतेपद मिळवलेलं नाही.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?