AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satta Sammelan 2026: अर्शदीप सिंग कधी करणार लग्न? Tv9 च्या व्यासपीठावरून दिलं उत्तर

Arshdeep Singh, Satta Sammelan: भारताचा वेगवान गोलंदज अर्शदीप सिंग याने टीव्ही 9 च्या सत्ता संमेलन कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्याने बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली. पण लग्न कधी करणार? या प्रश्नाच्या उत्तराने लक्ष वेधून घेतलं.

Satta Sammelan 2026: अर्शदीप सिंग कधी करणार लग्न? Tv9 च्या व्यासपीठावरून दिलं उत्तर
Satta Sammelan 2026: अर्शदीप सिंग कधी करणार लग्न? Tv9 च्या व्यासपीठावरून दिलं उत्तरImage Credit source: BCCI
| Updated on: Mar 24, 2026 | 3:37 PM
Share

टीव्ही 9 नेटवर्कच्या ‘व्हॉट्स इंडिया थिंक टुडे समिट-2026’ या कार्यक्रमाचं आयोजन दिल्लीत करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी क्रिकेटपटूंनी हजेरी लावली. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील विजेत्या संघातील खेळाडू या कार्यक्रमात उपस्थित होते. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला या कार्यक्रमात बोलतं केलं. चर्चा सुरू असताना त्याला लग्नाच्या प्रश्नाची गुगली टाकली गेली. तेव्हा अर्शदीपने या प्रश्नाचं दिलखुलासपणे उत्तर दिलं. त्याने सांगितलं की, अजून तीन चार वर्षे लग्न करणार नाही. अर्शदीप सिंगने मजेशीरपणे याचं उत्तर देताना सांगितलं की, मी वडिलांना सांगितलं आहे की चेहऱ्यावर हसू पाहिजे असेल तर लग्नाची गोष्ट करू नका. इतकंच काय तर लग्नाचा विषय निघाल्यानंतर त्याने अक्षर पटेलची फिरकी घेत सांगितलं की, अक्षर पटेलचं सांगायचं तर लग्नानंतर त्याच्या चेहऱ्यावर हसू आणावं लागतं.

अर्शदीप सिंगला कसली भीती सतावते?

क्रिकेटपटू अर्शदीप सिंगने सर्व प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरं दिली. यावेळी त्याने सर्वाधिक भीती कोणत्या गोष्टीची वाटते? याबाबतही उलगडा गेला. त्याला पर्याय म्हणून गर्लफ्रेंड आणि गौतम गंभीरचं नाव सुचवलं होतं. पण अर्शदीप सिंगने या दोन्ही पर्यायांना बगल देत देवाचं नाव घेतलं. मला देवाची भीती वाटते असं त्याने सांगितलं. अर्शदीप सिंगने टीव्ही 9 च्या व्यासपीठावरून लहान मुलांना संदेशही दिला. त्याने सांगितलं की, मुलांनी जास्त वेळ मोबाईलमध्ये घालवू नये. त्यापासून दूर राहिलं पाहिजे.

बुमराहबाबत म्हणला की….

जसप्रीत बुमराह प्रभाव गोलंदाज असण्याचं कारण काय? तेव्हा अर्शदीप सिंगने उत्तर दिलं की, जसप्रीत बुमराहला सर्व गोष्टी नैसर्गिकरित्या मिळाल्यात असं नाही. त्याची गोलंदाजीची शैली थोडी वेगळी आहे. पण सामन्यात प्रभाव टाकण्यासाठी तो तितकीच मेहनत घेतो. बुमराहची गोलंदाजी शैली जबरदस्त आहे. त्यामुळे गोलंदाजांना चकवण्यात मदत होते.

अर्शदीप सिंग मागच्या तीन वर्षांपासून भारताच्या टी20 आंतरराष्ट्रीय संघात आपली छाप सोडण्यास यशस्वी ठरला आहे. त्याने 2022 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केलं होतं. त्याने 84 सामन्यात 127 विकेट घेतल्या आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने आयपीएलमध्ये विकेटचं शतक पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. त्याने 82 डावात 97 विकेट घेतल्या आहेत.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?