IND vs SA : विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर व्हायरल झालेली मिस्ट्री गर्ल कोण? आयपीएलमध्येही दिसली होती

विराट कोहलीने रांची वनडे सामन्यात शतक ठोकत पुन्हा एकदा टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत. दुसरीकडे, विराटच्या शतकानंतर एक मिस्ट्री गर्ल सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यापूर्वी आयपीएलमध्येही दिसली होती. नेमकी ती आहे तरी कोण? जाणून घेऊयात..

IND vs SA : विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर व्हायरल झालेली मिस्ट्री गर्ल कोण? आयपीएलमध्येही दिसली होती
विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर व्हायरल झालेली मिस्ट्री गर्ल कोण? आयपीएलमध्येही दिसली होती
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 01, 2025 | 7:12 PM

Virat Kohli Fan Video: विराट कोहलीला फलंदाजी करताना पाहणं क्रीडाप्रेमींसाठी पर्वण असते. त्यात जोरदार आणि आक्रमक फटकेबाजी करत असेल मग क्रीडाप्रेमींच्या आनंदाला पारावर उरत नाही. रांची वनडे सामन्यात असंच चित्र पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या दोन वनडे सामन्यात विराट कोहली खातंही खोलू शकला नव्हता. त्यानंतर तिसऱ्या वनडेत रोहित शर्मासोबत विजयी भागीदारी करत अर्धशतक ठोकलं होतं. आता त्याचा फॉर्म दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यातही दिसून आला. विराट कोहलीने शतक ठोकताच पूर्ण स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला. फॅन्सना तर विराटच्या शतकाने एक स्फुरण मिळालं असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. यात एका फॅन्सचं स्वप्न पूर्ण झालं असं म्हणावं लागेल. विराट कोहलीच्या शतकानंतर मिस्ट्री गर्लचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोण आहे व्हायरल मिस्ट्री गर्ल?

व्हायरल व्हिडीओत मिस्ट्री गर्ल स्पष्ट सांगते की, ‘विराट कोहलीच्या समोर बसून त्याला शतक करताना पाहणं हे एका स्वप्नापेक्षा कमी नाही. खूप चांगलं वाटलं.’ रांची वनडे सामन्यात विराट कोहलीने शतक ठोकल्यानंतर व्हायरल झालेल्या मिस्ट्री गर्लचं नाव रिया वर्मा आहे. तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईलचं नाव _bachuuuu असं आहे. तिचे 2.5 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिने बायोत लिहिलं की, एक्टर, गेमिंग आणि लाइफस्टाईल.. तिच्या प्रोफाईलवरून एक गोष्ट स्पष्ट आहे की ती एक फॅशन मॉडेल आहे आणि सोशल मिडिया इंफ्ल्युएंसरही आहे. तिने आपल्या इंस्टाग्रामवर विराटच्या शतकी खेळीनंतरचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

रिया वर्मा यापूर्वी आयपीएल स्पर्धेदरम्यान आरसीबीच्या जर्सीत दिसली होती. रिया कायम विराट कोहलीचे व्हिडीओ शेअर करते. आता शेअर केलेल्या व्हिडीओला जवळपास 5 लाख लाईक्स मिळाले आहेत. रांची वनडे सामन्यात तिची रिएक्शन खूपच व्हायरल झाली होती. आता सोशल मीडियावर तिच्या नावाची चर्चा रंगली आहे.

विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये 52वं शतक ठोकलं. तसेच या फॉर्मेटमध्ये त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. तसेच देशात झालेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रमही नावावर झाला आहे. आता भारताचा दुसरा वनडे सामना रायपूरमध्ये 3 डिसेंबरला होणार आहे. विराट कोहलीच्या चाहत्यांना त्याच्याकडून आणखी एक शतकाची अपेक्षा आहे.