
रोहित शर्मा याने टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याच्यासोबत विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी ही टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीये. पण रोहितच्या नंतर टीम इंडियाचा नवा कर्णधार कोण होणार याची चर्चा सुरु झालीये. त्यातच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोमवारी सांगितले की, भारत जर पात्र ठरला तर पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये वरिष्ठ खेळाडू असतील. पुढील टी-२० कर्णधार सिलेक्टरच्या माध्यमातून निश्चित केला जाईल. जय शाह यांनी टी20 विश्वचषक 2024 मध्ये जेतेपद पटकावणाऱ्या वरिष्ठ खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले.
तीन दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती घेतल्यानंतर जय शाह म्हणाले की, हा संघ ज्या पद्धतीने खेळत आहे, आमचे लक्ष्य जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे आहे. त्यात जवळपास एकच संघ खेळणार आहे. वरिष्ठ खेळाडूही संघात असतील.” याचा अर्थ असा की फिट असल्यास, वरिष्ठ खेळाडू फेब्रुवारी-मार्चमध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघाच्या नऊ एकदिवसीय सामन्यांसाठी उपलब्ध असतील. भारताला श्रीलंका, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत.
जय शाह म्हणाले की, “भारताने प्रत्येक जेतेपद जिंकावे अशी माझी इच्छा आहे. आमची बेंच स्ट्रेंथ खूप मजबूत आहे. विश्वचषक संघातील केवळ तीन खेळाडू झिम्बाब्वेला जाणार आहेत. गरज पडल्यास आमचे तीन संघ खेळू शकतात.” हार्दिक पांड्याला टी-20 संघाचा कर्णधार बनवण्याच्या शक्यतेवर शाह म्हणाले की, ”कर्णधारपदाचा निर्णय निवड समिती घेतील आणि त्यांच्याशी चर्चा करून आम्ही ते जाहीर करू. . तुम्ही हार्दिकबद्दल बोललात, त्याच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले पण निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आणि त्याने स्वतःला सिद्धही केले.
T20 विश्वचषक जिंकल्यानंतर रविवारी रात्री चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर बार्बाडोसमधील विमानतळ बंद असल्याने भारतीय संघ अद्याप मायदेशी परतू शकलेला नाही. बीसीसीआयचे सचिव म्हणाले, “तुमच्या सारखे आम्हीही इथे अडकलो आहोत. यात्रेचे नियोजन झाल्यावर सत्कार समारंभाचा विचार करू.