
आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची निराशाजनक कामगिरी राहिली. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सचा संघ सर्वात तळाशी राहिला. त्यामुळे 2026 आयपीएल स्पर्धेपूर्वी होणाऱ्या मिनी लिलाव आणि ट्रेड विंडोत मोठ्या घडामोडी घडतील असं भाकीत वर्तवलं जात होतं. एकीकडे संजू सॅमसनसाठी चेन्नई सुपर किंग्सने पायघड्या टाकल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, दिग्गज फिरकीपटू आर अश्विन याने आयपीएल स्पर्धेला रामराम ठोकला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या पर्समध्ये मिनी लिलावापूर्वी 9.25 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. असं असताना फिरकीपटू आर अश्विनची जागा भरून काढण्याचं मोठं आव्हान असणार आहे. कारण आर अश्विन गोलंदाजीसोबत फलंदाजी देखील करायचा. त्यामुळे संघाची बाजू भक्कम व्हायची. आता त्याचा जागा भरून काढण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सकडे तीन पर्याय आहेत.
मायकल ब्रेसवेल : हा न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू आहे. आर अश्विनच्या जागी त्याला संघात संधी मिळू शकते. कारण आर अश्विनप्रमाणे गोलंदाजी आणि फलंदाजीत योगदान देऊ सखतो. खालच्या फळीत मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करण्यात सक्षम आहे. त्यात आयपीएल स्पर्धेत आरसीबीकडून खेळला आहे. त्यामुळे त्याच्याकडे अनुभव देखील आहे. आर अश्विनसाठी योग्य पर्याय ठरू शकतो. आयपीएल 2023 मध्ये आरसीबीकडू खेळताना त्याने सहा विकेट घेतले होते. तसेच 123.40 च्या स्ट्राईक रेटने 58 धावा केल्या होत्या. सध्या द हंड्रेडमध्ये सदर्न ब्रेव्सकडून खेळत आहे.
आदिल रशीद : आदिल रशीद एक अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. आदिल रशीद अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावू शकतो. त्याच्याकडे चांगला अनुभव असून चेन्नई सुपर किंग्स अशा खेळाडूंवर डाव लावण्यात माहीर आहे. पण आयपीएल स्पर्धेत एकही सामना खेळलेला नाही. पण एक चांगला पर्याय ठरू शकते. आर अश्विनची जागा भरून काढण्यात मदत होऊ शकते.
अकिल हुसैन : हा खेळाडू देखील आर अश्विनची जागा घेऊ शकतो. वेस्ट इंडिजच्या या खेळाडूची टी20 स्पर्धेत चांगली कामगिरी राहिली आहे. त्याने सातत्यपूर्ण चांगली गोलंदाजी केली असून क्रीडारसिकांचा लाडका झाला आहे. जर त्याला संधी मिळाली तर चेन्नई सुपर किंग्स संघात तितकी चागंली गोलंदाजी करू शकतो. आता चेन्नई सुपर किंग्स कसे फासे टाकते हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.