1..2..3….17 षटकार! रिंकु सिंहचं वादळ आशिया कप स्पर्धेपूर्वी घोंघावलं, 211.11 च्या स्ट्राईक केल्या धावा
उत्तर प्रदेश प्रीमियर लीग स्पर्धा सुरु असून या रिंकु सिंहचं वादळ या स्पर्धेत घोंघावलं. या स्पर्धेच्या 20व्या सामन्यात मेरठ मेवेरिक्सने मोठा विजय मिळवला. रिंकुच्या वादळी खेळीमुळे लखनौ फाल्कन्सचा दारूण पराभव झाला. या सामन्यात एकूण 17 मारले गेले.

त्तर प्रदेश प्रीमियर लीग स्पर्धेच्या 20व्या सामन्यात मेरठ मेवेरिक्स आणि लखनौ फाल्कन्स हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना रिंकु सिंहच्या नेतृत्त्वात मेरठ मेवेरिक्सने 93 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना मेरठ मेवेरिक्सने लखनौच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. आशिया कप स्पर्धेपूर्वी रिंकु सिंहने आपण फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. आता त्याचा फॉर्म पाहता प्लेइंग 11 मध्ये जागा मिळेल की नाही हे सांगणं आता कठीण आहे. पण भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमध्ये सामना खेळला गेला. रिंकु सिंहने या सामन्यात टॉस जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. स्वास्तिक चिकाराने संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. चिकाराने 31 चेंडूत 55 धावांची खेळी केली. यात त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. यानंतर ऋतुराज शर्मा आणि रिंकु सिंहने मैदानात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. या सामन्यात मेरठ मेवेरिक्स संघाने एकूण 17 षटकार मारले.
रिंकु सिंहने 27 चेंडूत 211.11 च्या स्ट्राईक रेटने 57 धावा केल्या. यात तीन चौकार आणि 4 षटकार मारले. तर ऋतुराज शर्माने 37 चेंडूत नाबाद 74 धावांची खेळी केली. त्याने 5 चौकार आणि 5 षटकार मारले. त्यानंतर ऋतिक वत्सने वादळी खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. ऋतिकने फक्त 8 चेंडूत 437.50 च्या स्ट्राईक रेटने 35 धावा ठोकल्या. यात दोन चौकार आणि 4 षटकार मारले. रिंकु सिंहच्या संघाने 20 षटकात 4 विकेट गमवून 233 धावा केल्या. पण लखनौ फाल्कन्स संघ या धावांचा पाठलाग करताना 18.2 षटकात सर्व गडी गमवून 140 धावा करू शकली. हा सामना रिंकुच्या संघाने 93 धावांनी जिंकला.
लखनौ फाल्कन्सकडून समीर चौधरीने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. या शिवाय एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. इतर फलंदाज 30 हा आकडाही गाठू शकले नाहीत. तर मेरठ मेवेरिक्सकडून या डावात यश गर्ग आणि जीशान अन्सारी यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर विजय कुमार आणि कार्तिक त्यागीने प्रत्येकी दोन गडी तंबूत पाठवले.
