
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण अफ्रिकेने भारताने 2-0 क्लिन स्विप दिला. आता तीन सामन्यांची वनडे मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं कमबॅक झालं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. ते प्लेइंग 11 चा भाग असतील यात काही शंका नाही. त्यात शुबमन गिल दुखापतीमुळे या मालिकेला मुकला आहे. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा केएल राहुलकडे आली आहे. शुबमन गिलच्या दुखापतीमुळे प्लेइंग 11 चं चित्रच पालटलं आहे. कारण शुबमन गिलकडे कर्णधारपद होतं आणि ओपनिंगला उतरत होता. आता रोहित शर्मासोबत ओपनिंगला कोण उतरणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोहित शर्मासोबत ओपनिंगसाठी शुबमन गिलच्या गैरहजेरीत तीन पर्याय आहेत. यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि केएल राहुल हे तिघं ओपनिंग करू शकतात.
कर्णधार केएल राहुलने पत्रकार परिषदेत मधल्या फळीत खेळणार हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड हे दोन पर्याय उरतात. ऋतुराज गायकवाल ओपनिंगला उतरतो. पण ऋतुराज गायकवाडला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणं कठीण आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वाल हा एकमेव पर्यात उरतो. रोहित शर्मासोबत ओपनिंगला यशस्वी जयस्वाल उतरणार यात काही शंका नाही. उजवं डावं असं कॉम्बिनेशनही होईल. त्यामुळे रोहित शर्मासोबत ओपनिंगला यशस्वी जयस्वालच उतरू शकतो.
तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली, चौथ्या क्रमांकावर अय्यरच्या जागी तिलक वर्मा, पाचव्या क्रमांकावर केएल राहुल, सहाव्या क्रमांकावर अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी, सातव्या क्रमावार वॉशिंग्टन सुंदर, आठव्या क्रमांकावर रवींद्र जडेजा, नवव्या क्रमांकावर कुलदीप यादव, दहाव्या क्रमांकावर हार्षित राणा आणि शेवटी अर्शदीप सिंग मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताचे संभाव्य प्लेइंग 11: रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), नितीश कुमार, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंग.