CSK vs KKR, IPL 2022 Match Prediction: चेन्नई सुपर किंग्स वि कोलकातामध्ये कोण मारणार बाजी, रेकॉर्ड काय सांगतो?

| Updated on: Mar 25, 2022 | 3:42 PM

CSK vs KKR, IPL 2022 Match Prediction: आयपीएलच्या 15 व्या सीजनची सुरुवात (IPL 2022) शनिवारपासून वानखेडे स्टेडियमवर होत आहे. पहिला सामना गतविजेते चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्समध्ये (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) होणार आहे.

CSK vs KKR, IPL 2022 Match Prediction: चेन्नई सुपर किंग्स वि कोलकातामध्ये कोण मारणार बाजी, रेकॉर्ड काय सांगतो?
IPL 2022: कोलकाता वि चेन्नई
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: आयपीएलच्या 15 व्या सीजनची सुरुवात (IPL 2022) शनिवारपासून वानखेडे स्टेडियमवर होत आहे. पहिला सामना गतविजेते चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्समध्ये (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) होणार आहे. दोन्ही संघांनी मागच्या सीजनमध्ये शानदार खेळ दाखवला होता. कोलकाता नाइट रायडर्सचा संघ एका वेगळ्याच अंदाजात फायनलमध्ये पोहोचला होता. चेन्नई सुपर किंग्सने फायनलमध्ये कोलकाताला नमवून चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद मिळवले होते. आता नव्या सीजनमध्ये दोन्ही संघ आमने-सामने येत असून कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये बाजी कोण मारणार? हा प्रश्न आहे. (IPL 2022 Match Prediction) कोलकाता आणि चेन्नई या दोन्ही संघांकडे नवीन कर्णधार आहेत. केकेआरचं नेतृत्व श्रेयस अय्यर आणि सीएसकेच नेतृत्व रवींद्र जाडेजा करतोय.

दोन्ही संघांकडे मॅच विनर खेळाडू

केकेआरने श्रेयस अय्यरकडे कमान दिली आहे. धोनीने CSK ची कॅप्टनशिप रवींद्र जाडेजाकडे सोपवली आहे. दोन्ही संघांकडे नवीन मॅच विनर खेळाडू आहेत. कुठला संघ सामना जिंकणार? हे सांगण कठिण आहे. क्रिकेटमध्ये आकडे तसे महत्त्वाचे असतात. त्यावरुन कुठल्या संघांची बाजू वरचढ आहे, ते कळते.

चेन्नई सुपर किंग्स नाइट रायडर्सवर भारी

आकड्यांवर नजर टाकली, तर चेन्नइ सुपर किंग्सची बाजू सरस आहे. दोन्ही टीम्समध्ये एकूण 26 सामने झाले आहेत. यात 17 सामने चेन्नईने तर फक्त आठ सामने केकेआरने जिंकले आहेत. आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाइट रायडर्सला दोन्ही लीग सामन्यांमध्ये पराभूत केले होते. चेन्नईने पहिला सामना सहा गडी राखून जिंकला तर दुसरा सामना कोलकाता नाइट रायडर्सने दोन विकेटने गमावला. फायनलमध्येही चेन्नई सुपर किंग्सने कोलकाताला 27 धावांनी पराभूत केलं होतं.

दरम्यान सलामीच्या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. चेन्नईने आतापर्यंत 12 उद्घाटनाचे सामने खेळले आहेत. यात सहा सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. दुसऱ्याबाजूला कोलकाताने सलामीचे 14 पैकी 10 सामने जिंकलेत.

कोलकाता आणि चेन्नईकडून सर्वात जास्त षटकार कोणी मारले?

कोलकातासाठी आंद्रे रसेलने सर्वाधिक 140 षटकार ठोकले. रसेलने कोलकातासाठी 114 चौकार लगावले. म्हणजे रसेल षटकारांमध्ये डील करतो.
CSK साठी एमएस धोनीने सर्वाधिक 189 षटकार लगावले आहेत. धोनी आयपीएलच्या या सीजनमध्ये आपले 200 षटकार पूर्ण करु शकतो.

चेन्नई आणि कोलकातासाठी सर्वात जास्त विकेट घेणारा खेळाडू कोण?

आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग मिळून कोलकातासाठी ऑफ स्पिनर सुनील नरेनने सर्वाधिक विकेट घेतल्यात. या दिग्गज गोलंदाजाने 161 विकेट घेतल्यात. चेन्नई सुपर किंग्ससाठी सर्वात जास्त 138 विकेट ड्वेन ब्रावोने घेतलेत.

चेन्नई आणि कोलकातासाठी सर्वात जास्त झेल कोणी घेतले?

चेन्नईसाठी सर्वात जास्त झेल सुरेश रैनाने घेतलेत. त्याने 98 कॅचेस घेतल्या. विद्यमान कर्णधार रवींद्र जाडेजाने 63 कॅचेस घेतल्यात. कोलकाताकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 26 कॅचेस घेतल्यात.