AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: CSK vs KKR सलामीच्या सामन्यासाठी वानखेडेवर ‘लाल रंगा’ची खेळपट्टी, टॉस का निर्णायक ठरणार ते समजून घ्या

IPL 2022 CSK vs KKR Wankhede pitch report: या पीचवर दवाचा किती परिणाम होईल? ही खेळपट्टी गोलंदाजीला अनुकूल असेल की फलंदाजीला? पीचकडून फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल का? वेगवान गोलंदाजांना खेळपट्टी कशी मदत करेल? टॉस जिंकल्यानंतर पहिला निर्णय कुठला घ्यायचा? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आहेत.

IPL 2022: CSK vs KKR सलामीच्या सामन्यासाठी वानखेडेवर 'लाल रंगा'ची खेळपट्टी, टॉस का निर्णायक ठरणार ते समजून घ्या
वानखेडे स्टेडियम सीएसके वि केकेआर Image Credit source: twitter
| Updated on: Mar 25, 2022 | 2:52 PM
Share

मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेचा थरार सुरु होण्यासाठी आता फक्त काही तासांचा अवधी उरला आहे. गतविजेते चेन्नई सुपर किंग्स आणि उपविजेते कोलकाता नाइट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यामध्ये पहिला सामना होणार आहे. दोन्ही संघांचा विजयी शुभारंभ करण्याचा प्रयत्न असेल. यामध्ये खेळपट्टीची भूमिका महत्त्वाची असेल. वानखेडे स्टेडियमवर (Wankhede stadium) होणाऱ्या IPL 2022 च्या पहिल्या सामन्यासाठी लाल रंगाचा पीच तयार करण्यात आला आहे. ही खेळपट्टी बनवण्यासाठी लाल रंगाची माती वापरण्यात आली आहे. त्यामुळे या पीचचा रंग लाल असेल. सरळ शब्दात सांगायचे झाल्यास वानखेडेचा पीच लाल मातीने बनवण्यात आला आहे. उद्या सीएसके आणि केकेआरचा संघ या ठिकाणी पहिल्या विजयासाठी भिडणार आहेत. लाल मातीने बनवलेला हा पीच कशा स्वरुपाचा असेल, हा प्रश्न आहे.

टॉस जिंकल्यानंतर पहिला निर्णय कुठला घ्यायचा?

या पीचवर दवाचा किती परिणाम होईल? ही खेळपट्टी गोलंदाजीला अनुकूल असेल की फलंदाजीला? पीचकडून फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल का? वेगवान गोलंदाजांना खेळपट्टी कशी मदत करेल? टॉस जिंकल्यानंतर पहिला निर्णय कुठला घ्यायचा? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आहेत. तुम्ही CSK किंवा KKR चे फॅन असाल, तर खेळपट्टी कशी असेल? हे जाणून घेणं, तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आकडे वानखेडे स्टेडियमबद्दल काय सांगतात ते जाणून घेऊया.

वानखेडेवर आकडे काय सांगतात?

वानखेडे स्टेडियमवर मागच्या तेरा सामन्यांचा रेकॉर्ड पाहिला, तर लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ 10 वेळा जिंकला आहे. मागच्या 20 सामन्यात पहिल्या डावात या खेळपट्टीवर सरासरी 175 धावा झाल्या आहेत. लाल मातीने बनवलेल्या या वानखेडेच्या पीचवर रिस्ट स्पिनरपेक्षा बोटांनी गोलंदाजी करणारे जास्त किफायती ठरले आहेत. मनगटी स्पिनरनी या खेळपट्टीवर 9.15 च्या इकॉनमीने प्रति 34 चेंडूंवर विकेट घेतल्या आहेत. तेच बोटांनी फिरकी गोलंदाजी करणाऱ्यांनी 6.92 च्या इकॉनमीने प्रति 27 चेंडूवर विकेट घेतल्या आहेत. आयपीएलच्या मागच्या सीजनमध्ये या मैदानावर झालेल्या सामन्यात पावरप्लेमध्ये वेगवान गोलंदाजांनी 31 विकेट घेतल्या आहेत.

CSK आणि KKR मध्ये टॉस जिंकल्यास कोणाला होणार फायदा?

वानखेडेच्या लाल मातीच्या पीचवर टॉस जिंका आणि गोलंदाजी घ्या, हा सोपा फंडा आहे. कारण लक्ष्याचा पाठलाग करताना दवाचा फायदा मिळतो. भारताचे माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा यांच्यामते अशा पीचवर चेंडूला उसळी चांगली मिळते. ज्याचा वेगवान गोलंदाजांना फायदा होतो. पावरप्लेच्या षटकात प्रतिस्पर्धी संघाच्या विकेट घेऊन त्यांना बॅकफूटवर ढकलता येईल. वानखेडेच्या पीचवर नव्या चेंडूने गोलंदाजी करताना पहिल्या तीन षटकात दोन ते तीन विकेट पड़ू शकतात. तुम्ही चांगली गोलंदाजी केली, तर फायदा मिळू शकतो.

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.