विराट कोहलीच्या शतकाने अभिजीत दिपके का दु:खी? ICC ला म्हटले होते कमकुवत संस्था

Abhijeet Dipke On Virat Kohli: विराट कोहलीच्या शतकाने सीजेपीचे नेते अभिजीत दिपके हे का नाराज झाले होते? त्यांनी आयसीसीवर का घेतले होते तोंडसुख? त्यांची जुनी पोस्ट सोशल मीडियावर सध्या चर्चेत आली आहे.

विराट कोहलीच्या शतकाने अभिजीत दिपके का दु:खी? ICC ला म्हटले होते कमकुवत संस्था
अभिजीत दिपके विराट शतकाने का नाराज
| Updated on: Oct 15, 2026 | 10:59 AM

Abhijeet Dipke On Virat Kohli: भारताचा ऑलराऊंडर विराट कोहलीची फटकेबाजी पाहायला अनेक प्रेक्षक आसुसलेले असतात. त्याच्या फलंदाजीवर अनेक खेळाडू फिदा आहेत. काहींनी तर त्याची फलंदाजी पाहून क्रिकेट विश्वात नाव कमावलं आहे. तर एका जुन्या पोस्टनुसार, विराट कोहलीच्या एका शतकानंतर कॉकरोच जतना पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके हे दु:खी झाले होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) कमकुवत संस्था म्हटले होते. दिपके यांची एक जुनी पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय होता तो किस्सा?

Loading...

काही वर्षांपूर्वी विराट कोहलीने एका सामन्यात झंझावाती शतक झळकावले होते. कोहलीच्या या शतकी खेळीने भारतीय संघाने सामना खिशात घातला होता. या सामन्यात पंचाच्या निर्णयाने वाद झाला होता. त्यावरून क्रिकेट जगतात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भारताविषयीच्या पक्षपाताची चर्चा झाली होती. अभिजीत दिपके यांनी त्यावेळी या घटनेवर नाराजी व्यक्त केली होती. जर अशा प्रकारे सामन्यात अम्पायरकडून चुकीचे निर्णय दिले जात असतील आणि एका विशिष्ट खेळाडूला अथवा संघाला झुकते माप दिले जात असेल, तर त्याचा फायदा खेळाडूच्या कामगिरीवर दिसतो. यामुळे त्या खेळाची निष्पक्षताही धोक्यात येते असे दिपके यांचे मत होते. अशा सामन्यात उत्तुंग कामगिरी करूनही विराटला पक्षपातीपणे बाद करण्याच्या निर्णयावर दिपके यांनी उपरोधिक टीका केली होती.

ICC वर ताशेरे

याच वादातून अभिजीत दिपके यांनी जागतिक क्रिकेट परिषदेच्या (ICC) कार्यपद्धतीवरही त्यांनी ताशेरे ओढले होते. आयसीसी ही नियमांची कडक अंमलबजावणीत करण्यात अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी ठेवला. आयसीसी ही एक कमकुवत संस्था असल्याचा राग त्यांनी व्यक्त केला. ही संस्था मोठ्या बोर्डाच्या आणि खेळाडूंच्या इशाऱ्यावर, दबावाखाली काम करत असल्याचा दावा दिपके यांनी केला होता. कोणत्याही एका खेळाडूसाठी, संघासाठी नियमांमध्ये लवचिकता दाखवली जाऊ शकत नाही, असे मतं दिपके यांनी मांडले होते.

उद्या तिरंगा आंदोलन

सीजेपी नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पोलिसांनी जंतरमंतरवरील आंदोलनामुळे ताब्यात घेतले होते. त्यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आले आहे. उद्या याप्रकरणी अभिजीत दिपके हे दिल्लीत तिरंगा आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तर सोशल मीडियावर क्रिकेट जगताशी संबंधित त्यांची ही पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us