
अँटिगा | इंग्लंड क्रिकेट टीमने 2019 मध्ये वर्ल्ड कप जिंकला. मात्र हीच इंग्लंड टीम 4 वर्षांनी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये साखळी फेरीतूनच बाहेर पडली. त्यानंतर आता इंग्लंड टीम वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्याची सुरुवात वनडे सीरिजने झालीय. इंग्लंडला पहिल्या सामन्यात 325 धावा करुनही पराभूत व्हावं लागलं. कॅप्टन शाई होप याने केलेल्या खणखणीत शतकाच्या जोरावर विंडिजने इंग्लंडवर विजय मिळवला. विंडिजने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता या मालिकेतील दुसरा सामना हा इंग्लंडसाठी निर्णायक असा आहे. हा सामन्याबाबत आपण सर्वकाही जाणून घेऊयात.
वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना 6 डिसेंबर रोजी होणार आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामन्याचं आयोजन हे सर विवियन रिचर्ड्स स्टेडियममध्ये अँटिंगा येथे करण्यात आलं आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल.
वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही.
वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर फॅनकोड एपवर पाहता येईल.
वेस्ट इंडिज क्रिकेट टीम | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), ब्रँडन किंग, एलिक अथनाझे, केसी कार्टी, शिमरॉन हेटमायर, शेरफेन रुदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटी, ओशाने थॉमस, रोस्टन चेस, केजॉर्न ओटली आणि मॅथ्यू फोर्ड.
इंग्लंड क्रिकेट टीम | जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), फिलिप सॉल्ट, विल जॅक्स, झॅक क्रॉली, बेन डकेट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ब्रायडन कार्स, रेहान अहमद, गस ऍटकिन्सन, मॅथ्यू पॉट्स, टॉम हार्टले, ऑली पोप आणि जॉन टर्नर.