Cricket : विंडीज रोहितसेनेविरुद्ध भिडणार, टीम जाहीर, पहिला सामना केव्हा?

West Indies vs Nepal T20i Series : नेपाळ आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी 20i मालिकेला आशिया कप 2025 स्पर्धेदरम्यान सुरुवात होणार आहे. जाणून घ्या मालिकेचं वेळापत्रक.

Cricket : विंडीज रोहितसेनेविरुद्ध भिडणार, टीम जाहीर, पहिला सामना केव्हा?
WI vs IND White Ball Series
Image Credit source: AP
| Updated on: Sep 18, 2025 | 4:16 PM

सध्या आशिया कप 2025 स्पर्धेत सुपर 4 साठी चुरस पाहायला मिळत आहे. ए ग्रुपमधील टीम इंडियानतंर पाकिस्तानने सुपर 4 मध्ये  प्रवेश मिळवला आहे. तर बी ग्रुपमधून श्रीलंकेनेही सुपर 4चं तिकीट मिळवलं आहे. आता बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 2 संघात सुपर 4 मधील एका जागेसाठी चुरस आहे.या स्पर्धेचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना 28 सप्टेंबरला होणार आहे. तर अंतिम सामन्याच्या 1 दिवसाआधी वेस्ट इंडिज विरुद्ध नेपाळ यांच्यातील टी 20i मालिकेला सुरुवात होणार आहे. उभयसंघातील या मालिकेचं आयोजन हे 27 ते 30 सप्टेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. विंडीज विरुद्ध नेपाळ यांच्यात शारजाहमध्येच तिन्ही सामने खेळवण्यात येणार आहेत. विंडीज क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे.

विंडीज क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने टी 20i मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. अकील हुसैन विंडीजचं नेतृत्व करणार आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

निवड समितीने नियमित टी 20i कर्णधार शाई होप याला विश्रांती दिली आहे. तसेच संघात 5 अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. एकीम अगस्टे, नवीन बिदैसी, रेमन सायमंड्स, अमीर जांगू आणि जिशान मोटारा या 5 खेळाडूंची पहिल्यांदाच संघात निवड करण्यात आली आहे. तसेच यूएसएसाठी 8 टी 20i सामने खेळणाऱ्या खेळाडूला विंडीज संघात संधी देण्यात आली आहे. फलंदाज करीमा गोरे याला संधी मिळाली आहे. करीमा यूएईनंतर विंडीजकडून खेळण्यासाठी सज्ज आहे.

अनुभवी खेळाडूंवर अधिकची जबाबदारी

संघात नवखे खेळाडू असल्याने अनुभवी क्रिकेटपटूंवर अधिकची जबाबदारी असणार आहे. विंडीज टीममध्ये अकील व्यतिरिक्त फॅबियन एलन, जेसन होल्डर आणि कायल मेयर्स यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी असणार आहे.

5 युवा खेळाडूंना संधी

रोहितकडे नेपाळच्या नेतृत्वाची जबाबदारी

दरम्यान नेपाळ क्रिकेट टीमची विंडीज विरुद्धच्या मालिकेसाठी 15 सप्टेंबरला घोषणा करण्यात आली. नेपाळ क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी 16 खेळाडूंना संधी दिलीय. रोहित पौडेल नेपाळचं नेतृत्व करणार आहे. तर दीपसिंह आयरी उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.

टी 20i मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 27 सप्टेंबर, शारजाह

दुसरा सामना, 29 सप्टेंबर, शारजाह

तिसरा सामना, 30 सप्टेंबर, शारजाह

नेपाळ विरुद्धच्या टी20i मालिकेसाठी विंडीज टीम : अकील हुसैन (कर्णधार), फॅबियन एलन, ज्वेल अँड्रयू, एकीम अगस्टे, नवीन बिडाइसे, जेडीया ब्लेड्स, केसी कार्टी, करीमा गोरे, जेसन होल्डर, अमीर जांगू, कायल मेयर्स, ओबेड मॅकॉय, जिशान मोटारा, रेमन सिमंड्स आणि शमर स्प्रिंगर.