
नवी मुंबई | वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स ऑस्ट्रेलिया यांच्यात नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये दुसरा टी 20 सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. कॅप्टन एलिसा हिली हीने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाला पहिले बॅटिंग करावी लागणार आहे. हरमनप्रीत कौर हीच्याकडे टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर एलिसा हिली ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद सांभाळत आहे.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या टी 20 सामन्यात 9 विकेट्सने धुव्वा उडवला होता. टीम इंडियाने विजयासाठी मिळालेलं 142 धावांचं आव्हान हे फक्त 1 विकेट गमावून पूर्ण केलं होतं. टीम इंडियाने त्या विजयासह 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी मालिकेतील आव्हान कायम ठेवायचं असेल, तर दुसरा सामना हा जिंकावा लागणार आहे. आता ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकल्यानंतर टीम इंडियाला बॅटिंगसाठी बोलावलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा टीम इंडियाला झटपट गुंडाळण्याचा प्रयत्न असणार आहे.
एलिसा पेरी हीचा 300 वा सामना
दरम्यान एलिसा पेरी हीचा हा 300 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. एलिसा यासह 300 सामने खेळणारी एकूण चौथी आणि दुसरी ऑस्ट्रेलियाई खेळाडू ठरली आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम हा टीम इंडियाची माजी कर्णधार मिथाली राज हीच्या नावावर आहे. मिथालीने 33 सामने खेळले आहेत.
नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने
🚨 Toss News 🚨
Australia have elected to bowl against #TeamIndia in the second #INDvAUS T20I.
Follow the Match ▶️ https://t.co/ar0sCktbHa@IDFCFIRSTBank pic.twitter.com/xXGad66Jfk
— BCCI Women (@BCCIWomen) January 7, 2024
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग आणि तितास साधू.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | एलिसा हिली (कॅप्टन आणि विकेटकीपर), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, अॅश्ले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ग्रेस हॅरिस, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम, किम गर्थ आणि मेगन शूट.