
क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे आशिया कप 2025 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याकडे लागून आहे. हा सामना रविवारी 14 सप्टेंबरला होणार आहे. तर दुसर्या बाजूला रविवारी टीम इंडियाचा आणखी एक सामना होणार आहे. टीम इंडिया या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे. मात्र हा सामना मेन्सचा नसून वूमन्स टीमचा असणार आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स यांच्यात एकूण 3 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. ही एकदिवसीय मालिका असणार आहे. नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर या मालिकेत भारताचं नेतृत्व करणार आहे. तर एलिसा हीली हीच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. उभयसंघात होणाऱ्या पहिला एकदिवसीय सामना कधी आणि कुठे पाहता येणार? हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय रविवारी 14 सप्टेंबरला होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय न्यू चंडीगडमधील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या एकदिवसीय सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅचचा थरार मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे अनुभवता येईल.
दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांची ही आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेआधीची शेवटची मालिका आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेला 30 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा राऊंड रॉबिन फॉर्मेटने होणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर या स्पर्धेत प्रत्येक संघाला इतर सर्व संघांविरुद्ध प्रत्येकी 1 सामना खेळायचा आहे. त्यानुसार रविवारी 12 ऑक्टोबरला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे या सामन्याआधी दोन्ही संघांना एकदिवसीय मालिकेतून एकमेकांची चांगली-कमी बाजू जाणून घेण्याची संधी असणार आहे.