WPL 2023 : Virat Kohli 20 वर्षाच्या मुलीसाठी का देव आहे? या मुलीच विराटशी काय कनेक्शन आहे?

| Updated on: Mar 10, 2023 | 12:57 PM

WPL 2023 : महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीमने अजून खातं उघडलेलं नाही. पण या टीममधील एक 20 वर्षांची ऑलराऊंडर मुलगी 2 मॅच खेळूनच स्टार बनली आहे.

WPL 2023 : Virat Kohli 20 वर्षाच्या मुलीसाठी का देव आहे? या मुलीच विराटशी काय कनेक्शन आहे?
virat kohli
Image Credit source: instagram
Follow us on

WPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीमला एक नवीन स्टार खेळाडू मिळाली आहे. फाफ डु प्लेसी, विराट कोहली, स्मृती मांधना, एलिस पेरी अशा स्टार खेळाडूंनी RCB ची टीम सजली आहे. या फ्रेंचायजीच्या नवीन स्टारच नाव आहे, श्रेयंका पाटील. महिला प्रीमियर लीगमध्ये श्रेयंका पाटिल कमाल करतेय. मूळची बँगलोर असलेल्या श्रेयंकाने लीगमध्ये आतापर्यंत 2 सामने खेळलेत. यात 2 विकेट घेऊन तिने 34 धावा केल्या आहेत. ती आपल्या ऑफ स्पिन गोलंदाजीने फलंदाजांना सतावते.

श्रेयंका पाटिल सुरुवातीला वेगवान गोलंदाज होती. त्यानंतर तिने लेग स्पिन गोलंदाजी सुरु केली. आता ती ऑफ स्पिन बॉलिंग करते. श्रेयंका पाटिल विराट कोहलीची मोठी फॅन आहे. कोहलीसोबत झालेल्या पहिल्या भेटीच्या आठवणी तिने शेअर केल्या. आरसीबीने पाटिलचा एक व्हिडिओ शेअर केलाय. यात ती तिच्या क्रिकेट प्रवासाबद्दल सांगतेय. या व्हिडिओमध्ये ती विराट कोहलीबद्दल सुद्धा बोलली.


यापुढे काय करायचं ते तिच ठरलंय

श्रेयंका पाटिलने सांगितलं की, वयाच्या 8-9 व्या वर्षापासून तिने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. वडिलांच्या मित्राच्या मदतीने विराट कोहलीला भेटण्याची संधी मिळाली. “मी विराट कोहलीला पहिल्यांदा भेटले, त्यावेळी मला विश्वास बसला नाही, असं श्रेयंका पाटिलने सांगितलं. मी त्याच्यासोबत फोटो काढला. विराटसोबतचा फोटो मी फ्रेम करुन ठेवलाय. त्यानंतर मी ठरवलं की, विराट कोहली बरोबर पुन्हा भेट होईल, त्यावेळी मी त्या फ्रेमवर कोहलीची साईन घेईन. आता मी त्यासाठी जास्त प्रतिक्षा करु शकत नाही” असं श्रेयंका म्हणाली.

विराट कोहली क्रिकेटचा देव

विराट कोहली माझ्यासाठी क्रिकेटचा देव आहे, असं श्रेयंका पाटिलने सांगितलं. मी त्याच्यामुळे क्रिकेट बघायला लागले. आरसीबी टीममध्ये झालेल्या निवडीबद्दल श्रेयंका म्हणाली की, “मी आरसीबीची फॅन आहे. माझ्या खोलीत फ्रेंचायजीशी संबंधित अनेक वस्तु आहेत. मी घरी गेली, तेव्हा पाहिलं आईच्या हातात आरसीबीचा फ्लॅग होता. वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आरसीबीमध्ये समावेश झाल्यानंतर मी आनंदाने उड्या मारल्या”