
गुल फिरोझा-मुनीबा अली या सलामी जोडीने केलेल्या नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर पाकिस्तान वूमन्स टीमने आशिया कप 2024 स्पर्धेतील नवव्या आणि साखळी फेरीतील आपल्या शेवटच्या सामन्यात यूएईवर 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. यूएईने पाकिस्तानला विजयासाठी 104 धावांचं आव्हान दिलं होतं. पाकिस्तानच्या सलामी जोडीने हे आव्हान 14.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. पाकिस्तानचा हा या स्पर्धेतील सलग आणि एकूण दुसरा विजय ठरला. तसेच या पराभवासह यूएईचं स्पर्धेतून अधिकृतरित्या पॅकअप झालं आहे.
गुल फिरोझा आणि मुनिबा अली या सलामी जोडीने सुरुवातीपासून फटकबाजी केली. पाकिस्तानने 14.1 ओव्हमध्ये बिनबाद 107 धावा केल्या. गुल फिरोझा हीने 55 बॉलमध्ये 8 चौकारांच्या मदतीने 62 धावांची नाबाद खेळी केली. तर मुनीबा अली हीने 30 बॉलमध्ये 4 चौकारांसह नाबाद 37 धावांचं योगदान दिलं. यूएईकडून 7 जणींनी बॉलिंग केली, मात्र एकीलाही ही जोडी फोडण्यात यश आलं नाही.
दरम्यान त्याआधी पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पाकिस्तानने यूएईला 20 ओव्हरमध्ये 8 बाद 103 धावांवर रोखलं. यूएईसाठी विकेटकीपर तीर्था सतीश हीने सर्वाधिक 40 धावा केल्या. कॅप्टन ईशा रोहित ओझा हीने 16 तर खूशी शर्माने 12 धावांचं योगदान दिलं.या तिघींव्यतिरिक्त इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. पाकिस्तानकडून सइदा इक्बाल, नशरा संधू आणि तुबा हसन या तिघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर कॅप्टन निदा दार हीने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
पाकिस्तानचा दणदणीत विजय
Sharp bowling backed up by fine fielding sees Pakistan restrict UAE to 103-8 in 20 overs 💫
The openers will begin the chase soon 🎯#PAKWvUAEW | #WomensAsiaCup2024 | #BackOurGirls pic.twitter.com/i4J6k7pS3q
— Pakistan Cricket (@TheRealPCB) July 23, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : निदा दार (कॅप्टन), गुल फिरोजा, मुनीबा अली (विकेटकीपर), तुबा हसन, सिद्रा अमीन, ओमामा सोहेल, आलिया रियाझ, फातिमा सना, सय्यदा आरूब शाह, नशरा संधू आणि सादिया इक्बाल.
यूएई प्लेइंग ईलेव्हन : ईशा रोहित ओझा (कर्णधार), तीर्था सतीश (विकेटकीपर), रिनीता राजित, समायरा धरणीधारका, कविशा इगोडागे, खुशी शर्मा, हीना होतचंदानी, सुरक्षा कोट्टे, वैष्णवे महेश, लावण्य केनी आणि इंधुजा नंदकुमार.