AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WIND vs WSL Final: स्मृती मंधानाची अर्धशतकी खेळी, श्रीलंकेला 166 धावांचं आव्हान

India Women vs Sri Lanka Women Final 1st Innings: श्रीलंकेला पहिल्यांदा आशिया कप जिंकण्यासाठी भारताने 166 धावांचं आव्हान दिलं आहे.

WIND vs WSL Final: स्मृती मंधानाची अर्धशतकी खेळी, श्रीलंकेला 166 धावांचं आव्हान
smriti mandhana battingImage Credit source: acc x account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 28, 2024 | 6:03 PM
Share

वूमन्स टीम इंडियाने आशिया कप 2024 स्पर्धेतील महाअंतिम सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी 166 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 165 धावा केल्या. भारतासाठी स्मृती मंधाना हीने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली. तसेच रिचा घोष हीने 30 आणि जेमिमाह रॉड्रिग्स हीने 29 धावा जोडल्या. तर शफाली वर्मा हीने 16 रन्स केल्या. तर इतरांना काही योगदान देता आलं नाही. श्रीलंकेसाठी कविषा दिलहारी हीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. आता श्रीलंकेला पहिल्यांदा आशिया कप जिंकून इतिहास रचणार की टीम इंडिया एकूण आठव्यांदा ट्रॉफी उंचावणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

टीम इंडियाची बॅटिंग

टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. टीम इंडियासाठी स्मृती मंधाना हीने सर्वाधिक धावा केल्या. स्मृतीने 47 बॉलमध्ये 10 फोरसह 60 रन्स केल्या. रिचा घोष हीने 30 धावा जोडल्या. जेमिमाह रॉड्रिग्सने 29 रन्स केल्या. तर शफाली वर्मा आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर या दोघींनी अनुक्रमे 16 आणि 11 धावांचं योगदान दिलं. उमा चेत्रीने 9 धावा केल्या. तर पूजा वस्त्राकर आणि राधा यादव या दोघी नाबाद परतली. पूजाने 5 आणि राधाने 1 धाव केली. तर श्रीलंकेकडून कविषा दिलहारीने दोघींनी मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर प्रबोधिनी, सचिनी निसंसला आणि कॅप्टन चमारी अथापथू या तिघींनी 1-1 विकेट घेतली. टीम इंडियाला फायनलच्या हिशोबाने मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. त्यामुळे आता भारतीय  खेळाडू 166 धावांचा बचाव करणार का? याकडे क्रिकेट चाहत्याचं  लक्ष लागून आहे.

श्रीलंकेसमोर 166 धावांचं आव्हान

श्रीलंका वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : चमारी अथापथु (कर्णधार), विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), हसिनी परेरा, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनी आणि सचिनि निसांसला.

टीम इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, उमा चेत्री, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, तनुजा कंवर आणि रेणुका ठाकूर सिंग.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट